Congress salutes brave Indian soldiers with Tiranga rally
चंद्रपूर :- ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी व अतिरेकी हल्यात बलिदान दिलेल्या जवान व नांगरीकांप्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस व शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपीता महात्मा गांधी चौक ते प्रियदर्शनी स्व. इंदिरा गांधी चौक पर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. Chandrapur Congress salutes brave Indian soldiers with Tiranga rally
यावेळी भर पावसात हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी ‘जय हिंद’, ‘भारत माता की जय’, ‘जरा याद करो कुर्बानी’ असे नारे देत रॅलीत सहभाग घेतला आणि भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम केला.

यावेळी भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान व संगणक क्रांतीचे आधुनिक भारताचे भाग्यविधाते माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम व दहशतवादी हल्ल्यात प्राणाची आहुती देणाऱ्या नागरिकांना सदभावना प्रदान करण्यात आली. यावेळी जय हिंद च्या नाऱ्यांनी चंद्रपूर नगरी दुमदुमल्याचे पहायला मिळाले.
रॅलीची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक येथून होऊन शहरातील मुख्य मार्गाने प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक येथे पोहचून येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशसेवेत आयुष्य झिझविलेल्या चंद्रपूर जिल्ह्य़ातील माजी सैनिकांची उपस्थिती लक्षणीय ठरली. सोबत शहरातील शाळा, महाविद्यालये विद्यार्थी, शिक्षक तथा सर्व धर्मीय देशप्रेमी नागरिक हजर होते.
या तिरंगा यात्रेमध्ये काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ गटनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अॅड. अभिजित वंजारी, जिल्हा प्रभारी मुजीब पठाण, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, चंद्रपूर येथील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हरीश गाडे, सदस्य संजय लोनकर, मदन देशमुख, अमलचंद मंडल, किरण देशमुख, बळवंत ठोंबरे, धिरज पोपटकर, राजेंद्र भोयर, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिह गौर, विनायक बांगडे, विनोद दत्तात्रेय, प्रवीण पडवेकर, सुर्यकांत खनके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत,अँड. विजय मोगरे, सतीश वारजुरकर, नंदू नागरकर, महिला जिल्हाध्यक्ष सुनंदाताई धोबे, शहराध्यक्ष चंदाताई वैरागडे, सुनीता लोढ़िया, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, यासह जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, एनएसयूआय, सेवादल, इंटक, किसान काँग्रेस, काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यासह हजारोंच्या संख्येने देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.