Friday, April 17, 2026
HomeIndustrialगॅस एजन्सी व गोदामला जिल्हाधिका-यांची अकस्मिक भेट

गॅस एजन्सी व गोदामला जिल्हाधिका-यांची अकस्मिक भेट

District Collector Pays Surprise Visit to Gas Agency and Warehouse

चंद्रपूर :- आखाती युध्दाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात पेट्रोलियम पदार्थ, घरगुती सिलिंडरची मागणी, एजन्सीकडून होत असलेला पुरवठा, ग्राहकांना रोज वाटण्यात येणा-या सिलिंडरची संख्या आदी बाबी तपासण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी गुरुवारी गॅस एजन्सी व सिलिंडरच्या गोदामला अकस्मिकपणे भेट दिली. यावेळी त्यांनी एजन्सीमध्ये असलेल्या स्टॉक रजिस्टरची पाहणी केली. तसेच भटाळी येथील गोदामला भेट देऊन प्रत्यक्ष भरलेले आणि रिकामे सिलिंडरची आकडेवारी घेतली. District Collector Pays Surprise Visit to Gas Agency and Warehouse

दीक्षाभुमी जवळ असलेल्या चेतक गॅस एजन्सीला आज (दि. 9) भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी पंत यांनी सुरुवातीला स्टॉक रजिस्टरची पाहणी केली. एजन्सीमध्ये उपस्थित असलेल्या ग्राहकांचे काम थांबवू नका, त्यांचे काम नियमितपणे करा, अशा सुचना एजन्सीच्या कर्मचा-यांना दिल्या. रोज किती ग्राहकांची बुकींग होते, सिलिंडर कसे उपलब्ध करून देता, रोजचा स्टॉक किती, यात घरगुती आणि व्यावसायिक सिलींडरची मागणी किती, उपलब्ध साठा, वाटप आणि शिल्लक सिलिंडर या बाबी नियमितपणे रजिस्टरमध्ये नोंद करता का, दुकानात आणि गोदाममध्ये किती सिलिंडर ठेवता, ग्राहकांना घरपोच वाटप होते का, आदी बाबींची माहिती जाणून घेऊन प्रत्यक्ष रजिस्टर सुद्धा तपासले. Stock Registers Inspected; Filled and Empty Cylinders Counted

रजिस्टरमध्ये दैनंदिन भरलेली माहिती आणि गोदाममध्ये असलेल्या, भरलेले आणि रिकामे सिलिंडरच्या संख्येत तफावत तर नाही ना, याकरीता त्यांनी चेतक गॅस एजन्सीचे भटाळी येथील गोदामला भेट दिली. तसेच व्यवस्थापकाकडून माहिती जाणून घेऊन सिलिंडरच्या स्टॉकचे रजिस्टरसुध्दा तपासले. एवढेच नाही तर भरलेले आणि रिकामे सिलिंडर आपल्यासमोर मोजण्यास सांगितले. दैनंदिन रजिस्टर मधील नोंदी आणि प्रत्यक्षात सिलिंडरची संख्या याची पडताळणी केली.

*अधिका-यांनी नियमितपणे तपासणी करावी :* जिल्ह्यात घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचा काळाबाजार होऊ नये, ग्राहकांना नियमितपणे सिलिंडरचे वाटप व्हावे, याकरीता अधिका-यांनी नियमितपणे गॅस एजन्सी आणि सिलिंडरच्या गोदामला भेटी देऊन तपासणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या. तपासणी दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, अन्न धान्य वितरण अधिकारी सुमेध चवरे, खरेदी अधिकारी राहुल वानखेडे आदी उपस्थित होते.

यावेळी चेतक गॅस एजन्सीचे मालक अनंत लहामगे यांनी जिल्हाधिका-यांना सांगितले की, युध्दाच्या काळात नागरिकांमध्ये अफवा पसरल्याने एकाच वेळी ग्राहकांनी बुकींग केली. त्यामुळे सुरवातीला पुरवठा करण्यात अडचण निर्माण झाली. मात्र आता हळूहळू परिस्थतीत सुधारणा होत असून आमच्या एजन्सीमधून दररोज 350 ते 400 सिलिंडर वाटप केले जातात. पेट्रोलियम कंपन्यांकडूनही आता नियमितपणे सिलिंडरचा पुरवठा होत आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्व रेकॉर्ड दैनंदिन नोंदविण्यात येतात.

*जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध :* चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून 8 एप्रिल 2026 रोजी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या 10 लक्ष 69 हजार 746 लिटर पेट्रोल पैकी 1 लक्ष 90 हजार 392 लिटर पेट्रोलची विक्री होऊन 8 लक्ष 79 हजार 354 लिटर पेट्रोलचा शिल्लक साठा, डिझेलचा एकूण साठा 13 लक्ष 6 हजार 880 असून यापैकी 4 लक्ष 60 हजार 176 लिटर डिझेलची विक्री होऊन 8 लक्ष 46 हजार 704 लिटर डिझेलचा शिल्लक साठा तर 8 एप्रिल रोजी घरगुती सिलिंडरचा एकूण साठा 15208, यापैकी विक्री 6458 आणि शिल्लक सिलिंडरचा साठा 8750 आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular