Close Oyo Hotel, Gandhi Giri Movement in Chandrapur
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील अष्टभुजा वार्डातील अष्टभुजा मंदिराजवळ हॉटल हायवे नावाने ओयो हॉटेल (OYO) सुरु झाल्याने वार्ड वासीय त्रस्त असल्याने वार्ड वासियांनी आज हॉटेल समोर गांधी गीरी पद्धतीने भजन कीर्तन करत आंदोलन केले. Close Oyo Hotel, Gandhi Giri Movement in Chandrapur
अष्टभुजा मंदिरा जवळ हॉटेल हायवे या नावाने ओयो हॉटेल सुरु झाल्याने वार्ड वासियांनी हॉटेल येथून स्थलांतरित करण्याची मागणी हॉटेल संचालकांना केली परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने वार्ड वासीयांनी
आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली, आमदार जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना तात्काळ कारवाईच्या सूचना केल्या परंतु मनपाने काहीही कारवाई केली नाही करिता आज दिनांक 24 डिसेंबर रोजी वार्डवासियांनी रामजी हरणे यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल समोर हरेकृष्ण हरेराम जपत भजन कीर्तन करत गांधी गीरी पद्धतीने आंदोलन केले.
प्रशासनाने आता तरी जागे होत सदर ओयो हॉटेल स्थलांतरित करावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेंत.