Thursday, June 18, 2026
HomeAccidentवैष्णवी अपार्टमेंटमधील दोन्ही बिअर शॉपी कायमस्वरूपी बंद करा

वैष्णवी अपार्टमेंटमधील दोन्ही बिअर शॉपी कायमस्वरूपी बंद करा

Permanently close the P.J. and P.G. beer shops in Vaishnavi Apartment

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील जगन्नाथ बाबा वॉर्ड येथील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या P.J. बिअर शॉपी व P.G. बिअर शॉपी या दोन मद्यविक्री केंद्रांमुळे परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करीत आमदार सुधाकर अडबाले यांनी पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेऊन दोन्ही दुकाने कायमस्वरूपी बंद करण्याबाबत निवेदन सादर केले. Permanently close the P.J. and P.G. beer shops in Vaishnavi Apartment

निवेदनात नमूद केल्यानुसार, मागील तीन ते चार वर्षांपासून सुरू असलेल्या या दोन्ही बिअर शॉपींमधून देशी व विदेशी मद्याची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. सकाळी लवकरपासूनच मद्य खरेदीसाठी मद्यप्रेमींच्या रांगा लागत असून, विशेषतः रविवार व सुट्टीच्या दिवशी येथे मोठी गर्दी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या गर्दीमुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम होत असून, ग्राहकांकडून रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते.

अलीकडेच एका महिलेचा अपघात होऊन ती जखमी झाल्याची घटना घडल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित दुकाने सोसायटीची परवानगी नसताना सुरू असून, दुकानांसमोर टिनशेड उभारून अतिक्रमणही करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी असून, दोन्ही बिअर शॉपी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी या प्रकरणाची दखल घेत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनाही देण्यात आले आहे.

दरम्यान, या दोन्ही बिअर शॉपी बंद करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांची भेट घेऊन पुढील पाठपुरावा केला जाईल, असे आमदार सुधाकर अडबाले यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी नगरसेवक पप्पू देशमुख, सिनेट सदस्य प्रा. दिलीप चौधरी तसेच परिसरातील मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular