Friday, January 17, 2025
HomeAssembly Electionसफाई कामगार चंद्रपूर विधानसभेच्या रिंगणात

सफाई कामगार चंद्रपूर विधानसभेच्या रिंगणात

Cleaning workers in Chandrapur assembly constituency

चंद्रपूर :- कोरोना काळात कोणी कुणा जवळ जात नव्हते, येत नव्हते, एखादा रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह निघाला कि त्याला वाळीत टाकल्यासारखे करायचे सोबतच त्याच्या कुटुंबालाही (कॉरेंटाइन) करायचे, रुग्णाला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यापासून तर त्याच्या उपचार व दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्याच्या मृत्युचे सोपस्कार माझासारख्या असंख्य कामगारांनी कोरोना काळात केलेत यात आमच्यातल्या काही कामगारांना जिवही गमवावा लागला परंतु त्याकाळातले वेतनही योग्य तसे नाही मिळाले, त्यानंतर सतत कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी पुढाकार घेत राहिलो, महानगर पालिके विरुद्ध घंटागाडी कामगारांसाठी आंदोलने केलीत यामुळेच कामगारांनी आपल्याला न्याय मिळविण्यासाठी विधानभवनात जाणे गरजेचे आहे म्हणून मला निवडणुकीत उभे केले आहे, आणि मी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीच निवडणुकीत उभा आहे असे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात उभे असलेले उमेदवार सफाई कामगार (घंटागाडी) रतन गायकवाड म्हणाले. Chandrapur Assembly Election घंटागाडी सफाई कर्मचारी चंद्रपूर विधानसभा रिंगणात

कंत्राटी कामगारांना योग्य वेतन, भत्ते, सुट्ट्या, आरोग्यावर उपचार, कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास कंत्राटदाराकडून काहीही सेवा मिळत नाही, नियमित काम मिळत नाही उलट कंत्राटदारांकडून कामगारांची पिळवणूक केली जाते करिता महानगरपालिका घंटागाडी कामगार संघटनेने संघटित होत रतन गायकवाड यांना कामगारांच्या न्याय व हक्क मिळवण्यासाठी रतन गायकवाड यांना विधानसभेत उभे केलेले आहे. सर्व कंत्राटी कर्मचारी गायकवाड यांच्या प्रचाराला सहकार्य करीत आहेंत, आणि कामगार स्वयमस्फूर्तीने प्रचाराला लागलेले आहेत. Our determination is to provide justice to the workers – Ratan Gayakwad

रतन गायकवाड यांना चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील कामगार मतदार किती मदत करतात हे 20 नोव्हेंबरला कळेल परंतु कामगारांच्या न्याय हक्कासाठी धनदांडग्या, मुरब्बी राजकारणी उमेदवाराविरुद्ध सफाई कामगार मैदानात उतरले हे विशेष…

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular