Friday, January 17, 2025
HomeAcb Trapबाबुपेठ परिसरात घरफोडी, अट्टल चोरट्यास शहर पोलीसांनी केली अटक

बाबुपेठ परिसरात घरफोडी, अट्टल चोरट्यास शहर पोलीसांनी केली अटक

Burglary in Babupeth area,                       Serial thief in custody of Chandrapur city police

चंद्रपूर :- शहरातील बाबुपेठ परिसरातील क्रांती चौक येथे राहणाऱ्या होमगार्ड विभागात कार्यरत रजनी जिवणे यांच्या घराची घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास शहर पोलीसांनी काही तासातच अटक करीत चोरीतील सोन्याचे टॉप्स व गहू मणी जप्त करीत एकूण 42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चंद्रपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बाबुपेठ डी एड कॉलेज मागील क्रांती चौकात राहणाऱ्या होमगार्ड पथकातील रजनी गौतम जिवणे या दिनांक 17 डिसेंबर पासून होमगार्ड कॅम्प करिता बाहेर असतांना दिनांक 22 डिसेंबर रोजी त्यांचे पती गौतम गेडाम पहाटे 5 वाजता घराला कुलूप लावून फिरायला गेले, परत आले असता घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील आलमारीच्या लॉकर मधील 4 ग्रॅम सोन्याचे टॉप्स आणि 2 ग्रॅम सोन्याचे 6 गहूमणी असे एकूण 42,000 रुपयांची चोरी झाल्याचे लक्षात आले. यावरून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

चंद्रपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास सुरु केला यावरून रेकॉर्डवरील आरोपी आशिष उर्फ जल्लाद अकरम शेख याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली यावरून चोरीतील सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
शहर पोलिसांनी सदर गुन्हा अवघ्या काही तासातच उघडकीस आणला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचे नेतृत्वाखाली पोउपनी संदीप बच्छीरे, मपोहवा भावना रामटेके, पोहवा सचीन बोरकर, संतोषकुमार कनकम, नापोका कपुरचंद खैरवार, पोका ईम्रान खान, राजेश चिताडे, दिलीप कुसराम, रूपेश रणदिवे, ईर्शाद खान, विक्रम मेश्राम यांनी केली आहे.

गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोषकुमार कनकम करीत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular