BJP welcomed the procession on the occasion of birth anniversary of Krantijyoti Savitribai Phule
चंद्रपूर :- महिला शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले Savitribai Phule यांच्या जयंती निमित्त माळी समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ भारतीय जनता पक्ष चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या BJP वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी नागरिकांना शीतपेयाचे वाटप करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय राऊत, विकास खटी, माजी नगरसेवक प्रशांत चौधरी, वंदना हातगावकर, संजय निकोडे, कालिदास धामनगे, विश्वजित शहा, राहुल मोहुर्ले, आशा देशमुख, सुमित बेले, कल्पना शिंदे, विमल कातकर, दीक्षा सातपूते, चंद्रशेखर देशमुख, सतनामसिंह मिरधा, स्वप्निल पटकोटवार, प्रविण कुलटे आदींची उपस्थिती होती.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज माळी समाज बांधवांच्या वतीने शहरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. सदर शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयाजवळ स्वागत मंच उभारण्यात आला होता. शोभायात्रा स्वागत मंचाजवळ पोहोचताच भारतीय जनता पक्षाच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी नागरिकांना शीतपेयाचे वाटप करण्यात आले.
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या जन संपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.