Friday, April 17, 2026
HomeCulturalछत्रपती शिवाजी महाराज सर्किटवर हेरिटेज टूरसाठी सहभाग नोंदवावा

छत्रपती शिवाजी महाराज सर्किटवर हेरिटेज टूरसाठी सहभाग नोंदवावा

Register for a heritage tour on the Chhatrapati Shivaji Maharaj Circuit

यवतमाळ :- भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी मार्फत छत्रपती शिवाजी महाराज सर्किटवर दि.9 जुन रोजी हेरिटेज टूरचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवसांच्या या टुरमध्ये शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करुन यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. Register for a heritage tour on the Chhatrapati Shivaji Maharaj Circuit

भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा भारत गौरव टुरीस्ट ट्रेन अंतर्गत 9 जूनपासून सुरू होत आहे. 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांना अनुभव घेता येणार आहे. Bharat Gaurav Tourist Train

भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. ही यात्रा आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी विविध अंगांनी सुसज्ज तयारी केली आहे. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

टुरमध्ये पहिला दिवस मुंबई, रायगड, पुणे. दुसरा दिवस पुणे येथील लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती. तिसरा दिवस शिवनेरी, भीमाशंकर, पुणे. चौथा दिवस प्रतापगड, कोल्हापूर. पाचवा दिवस कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा किल्ला, मुंबई. सहावा दिवस मुंबई टूरची समाप्ती असे पाच दिवसांचे नियोजन आहे.

टुर पॅकेजमध्ये भारत गौरव ट्रेनने प्रवास, हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड, ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन, प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क जसे किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी व सुरक्षा व्यवस्थेचा समावेश आहे. आरक्षण व अधिक माहितीसाठी आयआरसीटीसीच्या www.irctctourism.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular