Ballarpur police seized stock of dangerous weapons
चंद्रपूर :- बल्लारपूर पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे रेकॉर्ड वरील आरोपीच्या घरी धाड टाकत एकुण 6 लोखंडी तलवार, 1 भाला व 1 कुकरी असा घातक हत्यारांचा साठा घटनास्थळ जप्त केला यात प्रमोद श्रीहरी बरडे वय (58 वर्ष ), आकाश उर्फ पिंटु प्रमोद बरडे (30 वर्ष) दोन्ही रा. श्रीराम वार्ड, बल्लारपुर यांना अटक करण्यात आली आहे. Crime News बल्लारपूर पोलिसांनी जप्त केला हत्यारांचा साठा
पोलीस ठाणे बल्लारपुर येथे दि. 9 ऑक्टोबर 2024 चे रात्री 9 ते 10 वाजताच्या दरम्यान गोपनीय माहितीवरून आकाश उर्फ पिंटु प्रमोद बरडे, रा. श्रीराम वार्ड, बल्लारपुर, जि. चंद्रपूर याचे राहते घरी कायदेशिर रितीप्रमाणे घर झडती घेतली असता घरात 6 लोखंडी तलवार, 1 भाला व 1 कुकरी असा घातक हत्यारांचा साठा घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून पोलीस स्टेशनला भारतिय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन्ही आरोपीना ताब्यात घेवून अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे. Ballarpur police seized stock of dangerous weapons
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पो. अधिक्षक रिना जनबंधु, दिपक साखरे उपविभागिय पो अधिकारी, राजूरा यांचे मार्गदर्शनात पो. निरिक्षक सुनिल विठ्ठलराव गाडे, स.पो.नि. ए.एस. टोपले, पो.उप.निरिक्षक हुसेन शहा, स.फौ. गजानन डोईफोडे, आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, सुनिल कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शेखर माथनकर, शरदचंद्र कारूष, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, म.पो. अंमलदार अनिता नायडू, तसेच चालक पो. अंमलदार वामन शेंडे, भाष्कर कुंदावार, परमविर यादव, कैलाश चिंचवलकर, विकास खंदार, विना एलकुलवार, इत्याद्दी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे.