Bahujan Samaj Party to hold grand workers’ meet on June 23
चंद्रपूर :- आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून BSP बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने दिनांक 23 जून 2025 ला सकाळी 11.00 ते 5.00 वाजेपर्यंत राजीव गांधी सभागृह, जयंत टाकीज जवळ, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. Bahujan Samaj Party to hold grand workers meet
या मेळाव्याचा उद्देश बहुजन समाजाला शासनकर्ती जमात बनविणे आहे, जिल्ह्यात बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मागील अनेक दिवसांपासून Cadder Camp कॅडर कॅम्प च्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे काम केले आहे, त्याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरीय भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक राजाराम, नॅशनल तथा महाराष्ट्र राज्य प्रभारी उपस्थित राहणार असून मार्गदर्शन अॅड. सुनिलजी डोंगरे, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत,
या कार्यकर्ता मेळाव्याकरिता जिल्ह्यातील संपूर्ण विधानसभा पदाधिकारी कामाला लागले असून या मेळाव्यात स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत चर्चा करण्यात येणार आहे कार्यक्रमाची सुरुवात “जागृती जत्था” च्या कार्यक्रमापासून होणार आहे. Awareness group
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक राजाराम व प्रदेशाध्यक्ष अॅड. सुनील डोंगरे हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मार्त्यापण करून कार्यकर्त्यांसोबत पैदल रॅलीने कार्यक्रम स्थळी येणार आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता महेंद्र मकेश्वर, (जिल्हा इन्चार्ज), सुभाष पेटकर (जिल्हा महासचिव), धर्मेश निकोसे, प्रा. राजेश ब्राम्हणे, नंदू खोब्रागडे, मिलिंद शेंडे, रामराव नन्नावरे, पांडुरंग तुमराम (सर्व जिल्हा प्रभारी), अलका शिंदे सह संपूर्ण विधानसभा क्षेत्राचे पदाधिकारी, सेक्टर बुथ पदाधिकारी, जिल्हा महिला आघाडी, चंद्रपूर शहर आघाडी, शहर महिला आघाडी काम करीत आहेत. या मेळाव्याला बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूरच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी व समर्थकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे
आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे, जिल्हा उपाध्यक्ष, प्रा. लाडे सर, संघटन सचिव संतोष साखरकर, सचिव संजय मेश्राम, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा अलका शिंदे आदी उपस्थित होते.