Babupeth youth leader Sandeep Yasalwar commits suicide by hanging
चंद्रपूर :- बाबूपेठ परिसरातील पंचशील चौकातील पंचशिल बुद्ध विहारात बाबूपेठ येथील सुपरिचित युवा नेता संदीप यासलवार याने गळफास घेऊन आपले जिवन संपवले.
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील पंचशील बुद्ध विहारात संदीप यासलवार याने गळफास घेतल्याने परिसरात खळबळ माजली.
जगाला शांतीचा संदेश देनाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांची उद्या दिनांक 12 मे रोजी बुद्ध पौर्णिमां साऱ्या जगात मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते याचनिमित्ताने पंचशील बुद्ध विहारात उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परंतु या दुर्दैवी घटनेने सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बुद्ध विहार प्रशासनाने दिली.

