Saturday, January 17, 2026
HomeCrimeवीज कर्मचाऱ्यांवर हल्ला कराल तर पोलिस कोठडीत जाल

वीज कर्मचाऱ्यांवर हल्ला कराल तर पोलिस कोठडीत जाल

Attack on electricity workers and police custody

चंद्रपूर :- मार्च महिन्यात वीज बिल थकबाकी वसुलीची मोहीम जोरात सुरू होईल थकबाकी वसुलीसाठी अधिकाऱ्यांपासून कर्मचारी घरोघरी फिरतील मात्र मागील काही महिन्यापासून वीज कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर महावितरणनेही पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.
दुसरीकडे थकबाकीमुळे विज तोडण्यासाठी आलेल्या कामगारांवर हल्ला करणे महागात पडू शकते तुरुंगवासही होऊ शकतो, असेही Msedcl महावितरणद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. Attack on electricity workers and police custody

वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा वेळेत भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. व कर्मचारी हे शासकीय काम करीत असतात. थकबाकी वसुली व ती न झाल्यास वीज पुरवठा खंडित करणे हे सुद्धा शासकीय काम आहे. अशा सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा कार्यालयांची तोडफोड करणे आदी प्रकरणांमध्ये भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये शिक्षेची तरतूद आहे.

विजेची थकबाकी हेच मुख्य कारण
विनंती करूनही वीज बिलाची थकबाकी न भरल्यास महावितरण ग्राहकांची वीज खंडित करते प्रथम वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला जातो त्यानंतर ही थकबाकी भरली नाही तर वीज कायमस्वरूपी खंडित केली जाते. थकबाकीची वसुली हे वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमुख कारण आहे. वीज का कापली? असा सवाल करीत लोक हिंसक होतात.Dues recovery campaign in full swing

दहा वर्षे तुरुंगवासाची आहे तरतूद
शासकीय कामात अडथळा आणल्यास कलम 356 अंतर्गत फौजदारी कारवाई केली जाते. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना गैरवर्तन (कलम 504), धमकावणे (कलम 506), प्राणघातक हल्ला (कलम 332 आणि 333), कार्यालयात जबरदस्तीने प्रवेश करणे (कलम 427), सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, गोंधळ घालने (कलम 143, 148 आणि 150), अनधिकृत जमाव जमवणे (कलम 141 आणि 143) अंतर्गत कारवाई केली जाते यासाठी शिक्षा होऊ शकते. दोन ते दहा वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.

कारवाई काय होते
इलेक्ट्रिशियन हे सरकारसाठी काम करतात मारहाण, धक्काबुक्की यासारख्या घटनांची गंभीर दखल घेतली जाते. पोलीस तक्रार देऊन फौजदारी कारवाईही केली जाते. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तत्कालीन भारतीय दंड संहितेच्या 353 कलम सह घटनेच्या अनुषंगाने तक्रार दिली जात होती. आता भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये तक्रार देण्यात येत आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करत कारवाई केली जाते.

कोट्यावधी रुपयांची थकबाकी
जिल्ह्यातील वीज ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक शेती जोडण्याचा वाटा आहे. सध्या शेतकऱ्यांची चालू बिले माफ झाली आहेत. थकबाकीसाठी त्यांची वीज खंडित करण्यावरही बंदी आहे.

कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत – महावितरण

थकबाकी वसुली करण्यासाठी आलेले कर्मचारी हे त्यांचे कर्तव्य बजावत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. ग्राहकांनी वेळेवर बिल भरून अशा कृती टाळल्या पाहिजेत. अखंडित वीज पुरवठ्यासाठी वेळेवर बिले भरणे अत्यंत गरजेचे आहे असे महावितरणचे म्हणणे आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular