Agriculture assistant arrested while accepting bribe
एक हजारांची लाच स्विकारतांना कृषी सहाय्यकाला अटक
चंद्रपूर :- शेतकरी लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ देण्याकरिता 1 हजारांची लाच मागणाऱ्या भद्रावती तालूका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रांगेहाथ अटक केली. Agriculture assistant arrested while accepting bribe
भद्रावती तालुक्यातील माजरी कॉलरी येथील रहिवासी यांची तालुक्यातील नंदोरी येथे शेती असून त्यांनी भद्रावती तालुका कृषी कार्यालयात महाडिबीटी योजने अंतर्गत शेतात फवारणी करिता बॅटरी फवारणी पंप मिळणेकरिता सप्टेंबर 2024 मध्ये अर्ज सादर केला होता, त्यांना योजनेमध्ये पंप मंजूर झाला. कृषी विभागामार्फत तालुक्यातील चंदनखेडा येथे 7 ऑक्टोबर रोजी लाभ्यार्थ्यांना फवारणी पंप वितरित करण्यात आले, तक्रारदार बाहेरगावी असल्यामुळे चंदनखेडा येथील वितरणात सहभागी होऊ शकले नाही त्यामुळे त्यांना पंप स्वीकारता आला नाही. ACB Trap
काही दिवसानंतर तक्रारदार शेतकरी कृषी कार्यालयात फवारणी पंपाची मागणी करण्याकरिता भद्रावती कृषी कार्यालयात गेले आणि संबंधित भागातील कृषी सहायक सरजीव बोरकर यांना मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ करने सुरु केले. त्यानंतर दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी कृषी सहायक बोरकर यांनी तक्रारदार यांना फोन करून फवारणी पंप देण्याकरिता एक हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दिली. Anti Corruption Beuro Chandrapur
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने प्रकरणाची शहानिशा करून गोपनीयरित्या सापळा रचला दरम्यान कृषी सहायक बोरकर यांनी एक हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली.
दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सापळा कारवाई दरम्यान ठरलेल्या ठिकाणी वरोरा येथील विनायक लेआऊट च्या नंदनवन प्रवेशद्वाराजवळ कृषी सहायक सरजीव बोरकर यांना 1000 रुपयांची लाच स्विकारतांना रांगेहात अटक करण्यात आली. पुढील तपास सुरु आहे.
सदर कारवाई दिगंबर प्रधान ला. प्र. वि. नागपूर, संजय पुरंदरे अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वी. नागपूर, मंजुषा भोसले पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, पोशि वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, राकेश जांभुळकर, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम व सर्व लाचलूचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी पार पाडली.



