Agricultural motor pump thieves arrested
चंद्रपूर :- शेतीत शेतपीकांना पाणी देणाऱ्या मोटर पंपची चोरी करणाऱ्या 3 चोरट्याना लालपेठ परिसरातून चंद्रपूर शहर पोलीसांनी अटक केली.
चंद्रपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील नांदगाव पोडे परिसरात शेतात पाणी देणाऱ्या मोटर पंपाची चोरी होत असल्याची तक्रार चंद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली, यावरून पोलिसांनी तपास मोहीम राबवत रात्रौ फिरणाऱ्या तीन युवकांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता तिघांनी मोटर पंपाची विक्री करिता चोरी करून त्यातील तांब्याचे तार लपवून ठेवल्याची कबुली दिली यावरून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले.
आरोपी लोकेश उर्फ शालू पिंकू चव्हाण (19 वर्ष), सलमान साहेब अली शेख (19 वर्ष) व प्रेम दीपक उपरकर (18 वर्ष) तिघेही राहणार लालपेठ जुनी वस्ती यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरीतील साहित्य जप्त करण्यात आले आहे. Chandrapur Crime
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोउपनि संदीप बच्छिरे, पोहवा सचिन बोरकर, संतोष कणकम, नापोका कपूर चंद खैरवार, इम्रान खान, राजेश चिताडे, रुपेश रणदिवे, दिलीप कुसराम, विक्रम मेश्राम, इर्शाद खान यांनी केली.