Saturday, April 26, 2025
HomeCrimeजीवितास धोकादायक नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई

जीवितास धोकादायक नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई

Action against life-threatening nylon manja seller

जीवितास धोकादायक नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई

चंद्रपूर :- पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रेत्यावर रामनगर पोलिसांनी छापा टाकत 104 बंडल जप्त करीत एकूण 1,23,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Action against life-threatening nylon manja seller

पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील नागीनाबाग सेंट मायकल शाळेजवळ गौरव गोटफोडे लपूनछपून नॉयलन मांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अफराज शेख यांना मिळाली त्यानुसार त्यांनी शोध पथकातील अधिकारी व अंमलदार याना छापा घालून कठोर कारवाईच्या सूचना देऊन योग्य ते मार्गदर्शन केले. नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई

त्यानुसार शोध पथकातीीन अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय गोपनीय पद्धतीने नियोजनबद्धरित्या मांजा विक्री ठिकाणी नगीनाबाग येथील अष्ठविनायक पतंग सेंटर या दुकानावर छापा घालून दुकानाची झडती घेतली असता दुकानात मराहाष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानव व सजीव पशु पक्षी याचे जिवीतास धोका निर्माण करणा-या नायलॉन मांजाचे एकूण 1,23,800 रूपये किंमतीचे एकूण 104 बंडल जप्त केले असून त्याचेविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ramnagar Police Station

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, हिमाशु उगले, पोलीस अंमलदार आनंद खरात, सचिन गुरनुले, लालू यादव, पेतरस सिडाम, प्रशांत शेंदरे, शरद कूड़े, मनिषा मोरे, अमोल गिरडकर, रविकुमार ढेंगळे, संदिप कामडी, हिरालाल गुप्ता, पंकज ठोँबरे, प्रफुल पूप्पलवार, आमित, ब्युटी साखरे व गुन्हे शोध पाथकाने केली आहे.

चंद्रपूर शहरात मानवी आरोग्यास व पर्यावरणास घातक असणा-या मांजाची विक्री कोठे होत असल्यास पोलीस स्टेशन रामनगर येथे संपर्क करावा, असे आवाहन रामनगर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular