Accidental death of forest guard Vishal Mantriwar
चंद्रपूर :- बल्लारशाह वन परीक्षेत्र मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर अंतर्गत बल्लारपूर वन उपज तपासणी नाका येथे कार्यरत वनरक्षक विशाल मंत्रिवार (47 वर्ष) यांचा आज दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी बाबुपेठ रेल्वे रुळावर अपघाती निधन झाले.
विशाल मंत्रिवार वन उपज तपासणी नाका येथे रुजू होण्या आधी चंद्रपूर वनपरीक्षेत्रातील बाबुपेठ बिट क्षेत्रात कार्यरत होते.
मंत्रिवार मनमिळाऊ स्वभावाचे होते, त्यांच्या अकस्मात निधनाने वनविभागात आश्चर्याचा धक्का बसला आहे,
त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी आणि आप्त परिवार आहे.