Wednesday, October 28, 2026
HomeCulturalलालपेठच्या प्राचीन महाशिवलिंगाला धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी आ. किशोर जोरगेवार यांचा पुढाकार

लालपेठच्या प्राचीन महाशिवलिंगाला धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी आ. किशोर जोरगेवार यांचा पुढाकार

चंद्रपूर :- लालपेठ येथील राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन महाशिवलिंगाची महती राज्यभर पोहोचवून या स्थळाला प्रमुख धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेतला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून महाशिवलिंग परिसरात त्यांच्या वतीने भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली असून, दर सोमवारी विविध समाजांच्या वतीने महापूजेचे आयोजन केले जात आहे. यंदाच्या सोमवारी यदुवंशी समाजाच्या वतीने भजन संध्या अभिषेक आरती आणि प्रसाद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून पूजेत सहभाग घेतला. Maha Shivling in Lalpeth onto the religious tourism map.

40 हजारांची लाच स्वीकारताना कोरपन्यातील कृषी सहायक ACB च्या जाळ्यात…..

            चंद्रपूरच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाला व्यापक ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांनी लालपेठ येथील प्राचीन महाशिवलिंगाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. या महाशिवलिंगाची भव्यता, प्राचीनत्व आणि धार्मिक महती केवळ चंद्रपूरपुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांपर्यंत पोहोचावी, अशी त्यांची भूमिका आहे.

           दर सोमवारी वेगवेगळ्या समाजांच्या वतीने महाअभिषेक आयोजन करण्याचा उपक्रमही आमदार जोरगेवार यांच्या पुढाकारातून राबविला जात आहे. यामुळे विविध समाजांना या धार्मिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळत असून, महाशिवलिंग परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होण्यासोबतच सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्याचाही प्रयत्न होत आहे. याच उपक्रमांतर्गत यंदा यदुवंशी समाजाच्या वतीने भजन संध्या, महाअभिषेक आरती आणि महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भव्य महाशिवलिंग आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते.

          धार्मिक स्थळांचा विकास हा केवळ मंदिर उभारण्यापुरता मर्यादित न ठेवता त्या स्थळाची ओळख व्यापक स्तरावर निर्माण करणे, भाविकांचा सहभाग वाढविणे आणि परिसरात धार्मिक पर्यटनाच्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे, या दृष्टिकोनातून आमदार किशोर जोरगेवार प्रयत्नशील आहेत. लालपेठ येथील महा शिवलिंगाची महती राज्यभर पोहोचल्यास चंद्रपूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळू शकते, तसेच या भागाला नवी ओळख प्राप्त होऊ शकते.

  प्राचीन महाशिवलिंगाचा वारसा जतन करून त्याला व्यापक धार्मिक ओळख मिळवून देणे आणि अधिकाधिक भाविकांना या स्थळाशी जोडणे, हा आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारामागील प्रमुख उद्देश आहे. त्यांच्या या प्रयत्नांतून लालपेठ येथील महाशिवलिंग परिसर धार्मिक श्रद्धा, सामाजिक सहभाग आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular