Wednesday, October 28, 2026
HomeEmployment१० वर्षांच्या संघर्षाला न्याय ! NHM कर्मचाऱ्यांसाठी ‘अधिसंख्य पदां’चा ऐतिहासिक निर्णय

१० वर्षांच्या संघर्षाला न्याय ! NHM कर्मचाऱ्यांसाठी ‘अधिसंख्य पदां’चा ऐतिहासिक निर्णय

चंद्रपूर :- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभरात कार्यरत असणाऱ्या आणि १० वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण केलेल्या पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीत ‘अधिसंख्य पदे’ निर्माण करून नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गेली अनेक वर्षे आपल्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून सेवेचे स्थैर्य प्राप्त झाले आहे. A historic decision to create ‘supernumerary posts’ for NHM employees

खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी आमदार ते खासदार आत्तापर्यंत सात्यत्य पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रवासात त्यांनी हा प्रश्न अत्यंत आक्रमकपणे मांडला होता. आपल्या लोकप्रतिनिधी पदाच्या कालावधीत त्यांनी विधानसभेचे सत्र, तारांकित प्रश्न, विविध संसदीय आणि वैधानिक आयुधांचा प्रभावीपणे वापर करून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांनी केवळ मागणीच केली नाही, तर सातत्याने शासनस्तरावर बैठका घेऊन आणि वैधानिक मार्गाने पाठपुरावा करून या लढ्याचा पाठलाग केला. त्यांच्या या अविरत प्रयत्नांना आणि दूरदृष्टीला यश मिळून शासनाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.

शासनाच्या या योजनेअंतर्गत दिनांक २५ जून २०२६ पर्यंत तांत्रिक खंड वगळून १० वर्षे किंवा त्याहून अधिक सेवाकाळ पूर्ण करणारे पात्र कंत्राटी कर्मचारी या निर्णयासाठी पात्र ठरले आहेत. कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करताना, त्यांच्या सध्याच्या वेतनाला पूर्ण संरक्षण देण्यात आले असून मूळ वेतनासोबत महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता पूर्ववत लागू राहील. तसेच, या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांच्या सेवेची कमाल वयोमर्यादा ५८ वर्षे निश्चित करण्यात आली असून, संबंधित कर्मचारी सेवेत असेपर्यंतच हे पद अस्तित्वात राहील आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते पद आपोआप व्यपगत होईल.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आमदारकीपासून ते खासदारकीपर्यंत केलेल्या अथक पाठपुराव्यामुळेच हा बिकट प्रश्न सुटू शकला आहे. या अभूतपूर्व आणि न्याय्य निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील एन.एच.एम. कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सर्वांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे मनापासून आभार मानले आहेत.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular