चंद्रपूर :- बाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याशेजारी असलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था दूर करून त्याचे नूतनीकरण करावे, तसेच राजाभाऊ खोब्रागडे भवनाची स्वच्छता करून ते नागरिकांच्या वापरासाठी खुले करावे, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने चंद्रपूर महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
बाबूपेठ परिसरातील सार्वजनिक शौचालयाची अवस्था लक्षात घेता, त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. शक्य असल्यास संपूर्ण नूतनीकरण करून नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. सार्वजनिक स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या समस्येकडे महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही यावेळी सांगण्यात आले.
याशिवाय, राजाभाऊ खोब्रागडे भवनाची स्वच्छता करून ते नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही बसपाच्या वतीने करण्यात आली. या दोन्ही मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी बसपाच्या नगरसेविका सौ. सोनियाताई प्रशांत उंदिरवाडे (प्रभाग क्र. १७), प्रशांतभाऊ उंदिरवाडे, इंजि. विमित कोसे शहराध्यक्ष, बसपा, दादाजी धाकडे शहर संघटक, किशोरभाऊ चिकटे बाबूपेठ झोन प्रभारी, अखिल निमगडे शहर सदस्य, जीवन कांबळे, मनोहर साखरे विधानसभा कोषाध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणासह मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
