Monday, October 5, 2026
HomeMPखासदार प्रतिभा धानोरकरांना पुन्हा संसदीय जबाबदारी

खासदार प्रतिभा धानोरकरांना पुन्हा संसदीय जबाबदारी

चंद्रपूर :- खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांची वर्ष २०२६-२७ साठी ‘कोळसा, खाणी आणि पोलाद उद्योग’ या विषयक संसदीय स्थायी समितीवर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. Lok Sabha Standing Committee on Coal, Mines, and Steel

लोकसभा सचिवालयाने ४ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, लोकसभा बुलेटिन भाग-२ (परिच्छेद क्र. ६१८७) द्वारे या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ही नियुक्ती २६ सप्टेंबर २०२६ पासून अमलात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदी खासदार अनुराग सिंह ठाकूर यांची नियुक्ती माननीय लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आली आहे.

चंद्रपूर व परिसरातील कोळसा आणि खनिज क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न, कामगारांचे हित, पर्यावरण संतुलन आणि स्थानिक उद्योगांचा विकास यावर खासदार प्रतिभा धानोरकर या समितीच्या माध्यमातून संसदेत प्रभावीपणे आवाज उठवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular