चंद्रपूर :- मोबाईलवर एपीके लिंक पाठवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारी सायबर टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट आरटीओ टॅक्स चालानच्या RTO Tax Challan नावाखाली एपीके फाईल Apk File पाठवून व्हॉट्सॲप हॅक Whatsapp Hack करण्यात आले. त्यानंतर संबंधित क्रमांकावरून २५६ जणांचा ब्रॉडकास्ट ग्रुप तयार करून त्यांनाही त्याच लिंकच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन मंडल यांनी केली. WhatsApp Hacked via APK Link in Chandrapur
चंद्रपुरात राहत्या घरी वेश्याव्यवसाय – LCB ची धाड…..
मंडल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ४ वाजता त्यांच्या व्हॉट्सॲपवर एका महिलेच्या मोबाईल क्रमांकावरून संदेश आला. या संदेशासोबत ‘आरटीओ टॅक्स चालान एपीके’ नावाची फाईल होती. तसेच, ‘लिस्टमध्ये आपले नाव व पत्ता तपासा’ असा मजकूरही त्यात होता.
युवतीला घरात कोंबून जबरी चोरी……
शासकीय कामकाजाशी संबंधित संदेश असावा, असा समज झाल्याने मंडल यांनी ती एपीके फाईल डाउनलोड केली.
फाईल डाउनलोड केल्यानंतर सुमारे साडेतीन तासांनी, सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास त्यांचे व्हॉट्सॲप हॅक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा ताबा घेतल्यानंतर त्यावरून सुमारे २५६ लोकांचा ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केला. या ग्रुपवर पुन्हा तीच एपीके लिंक पाठविण्यात आली. Money Siphoned from Three Accounts
मंडल यांच्या परिचयातील तीन व्यक्तींनी त्यांच्या क्रमांकावरून आलेला संदेश विश्वासार्ह समजून लिंक उघडली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यांतून रक्कम काढण्यात आल्याचे मंडल यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात केवळ एका व्यक्तीचे व्हॉट्सॲप हॅक न होता, त्याचा वापर करून इतर नागरिकांनाही फसविण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
प्रकार लक्षात येताच सचिन मंडल यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरण सायबर सेलकडे वर्ग केले असून, सायबर तज्ज्ञांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. Cyber Crime
“माझ्यासारख्या इतर कोणत्याही निष्पाप नागरिकाची फसवणूक होऊ नये, या सामाजिक भावनेतून हा प्रकार जनतेसमोर आणत आहे. नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या एपीके फाईल्स, लिंक किंवा संशयास्पद संदेशांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन मंडल यांनी केले.
दरम्यान, एपीके फाईलच्या माध्यमातून मोबाईलचा ताबा घेऊन आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रकारांबाबत नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची गरज आहे. संशयास्पद लिंक किंवा फाईल प्राप्त झाल्यास ती उघडण्यापूर्वी तिची खात्री करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
chandrapurtoday6@gmail.com
