Sunday, October 4, 2026
HomeDistrict Collectorदुष्काळी परिस्थितीत अधिकारी - कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये

दुष्काळी परिस्थितीत अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये

चंद्रपूर :- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क व गतिमान राहणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहावे. अत्यंत तातडीची वैद्यकीय परिस्थिती वगळता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारच्या रजेवर जाऊ नये अथवा मुख्यालय सोडू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत. Officers and employees must not leave headquarters during drought conditions

चंद्रपुरात व्हॉट्सॲप हॅक – तिघांच्या खात्यातून रक्कम लंपास……

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई, चाराटंचाई तसेच पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. या परिस्थितीत शासन स्तरावरून विविध मदत व सवलतींच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचा लाभ पात्र शेतकरी व नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी तत्परतेने कार्यवाही करणे आवश्यक आहे.

चंद्रपुरात राहत्या घरी वेश्याव्यवसाय – LCB ची धाड……

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील तरतुदींनुसार प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे. प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून त्यांच्या विभागाशी संबंधित दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना वेळेत राबवाव्यात. तसेच नागरिकांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

अत्यंत तातडीची वैद्यकीय परिस्थिती वगळता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या पूर्वपरवानगीशिवाय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी रजा घेऊ नये अथवा मुख्यालय सोडू नये. या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील तरतुदींनुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी स्पष्ट केले आहे.

chandrapurtoday6@gmail.com

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular