Monday, September 28, 2026
HomeBudgetकर ऑडिट अहवाल सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवा

कर ऑडिट अहवाल सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवा

चंद्रपूर :- आकारणी वर्ष २०२६-२७ साठी कर ऑडिट अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ ऐवजी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात यावी, अशी लोकहितकारी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन Union Finance Minister Nirmala Sitharaman यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. Extend the deadline for submitting the tax audit

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन……..

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, व्यावसायिक व कर सल्लागार हे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आयकर रिटर्न भरण्याच्या कामात व्यस्त होते. त्यानंतर आयकर विभागाच्या पोर्टलमधील युटिलिटीमध्ये झालेले बदल, आर्थिक विवरणांचे जुळवणी व पडताळणी काम, तसेच जीएसटी आणि टीडीएस/टीसीएस च्या वैधानिक पूर्ततेचा वाढता ताण यामुळे ऑडिट पूर्ण करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी उपलब्ध झाला आहे. भाजप सरकार विरोधात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा….

या सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, आयकर कायदा १९६१ च्या कलम ११९ अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करत अर्थ मंत्रालयाने कर ऑडिट अहवाल सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवावी व त्यासंबंधीची अधिसूचना त्वरित जारी करावी, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular