Sunday, September 20, 2026
HomeHealthघुग्घूस ग्रामीण रुग्णालयाचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते लोकार्पण

घुग्घूस ग्रामीण रुग्णालयाचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते लोकार्पण

चंद्रपूर  :- घुग्घूसच्या नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यामुळे आता येथील नागरिकांना उपचारासाठी वारंवार चंद्रपूरला जाण्याची गरज भासणार नाही. ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या घुग्घूसचा सर्वांगीण विकास व्हावायासाठी सातत्याने प्रयत्न केले असून नगर परिषदउड्डाणपूल आणि आता ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहेअसे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Inauguration of the Ghughus Rural Hospital by Guardian Minister Prof. Dr. Ashok Uike

राजुरा बहुचर्चित पापा जाधव हत्याकांडातील सहाव्या आरोपीला अटक…..

 सेवा संकल्प अभियाना अंतर्गत घुग्घूस येथील ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईकेआमदार देवराव भोंगळेआमदार करण देवतळेयांच्यासह लोकप्रतिनिधीअधिकारीपदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्याने घुग्घूस आणि परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे उपचारासाठी चंद्रपूर शहराचा प्रवास करण्याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. चंद्रपूर पोलीस दलात 14 नवीन वाहने दाखल………

             यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कीघुग्घूस येथे ग्रामीण रुग्णालय सुरू व्हावे यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला होता. वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घेता येथे सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध होणे आवश्यक होते. आता ग्रामीण रुग्णालय प्रत्यक्ष सेवेत दाखल झाल्यामुळे घुग्घूससह परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे. विशेषतः तातडीच्या उपचारांसाठी नागरिकांना चंद्रपूरला जाण्याची आवश्यकता कमी होणार असून स्थानिक पातळीवरच आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

              घुग्घूसच्या सर्वांगीण विकासाचा उल्लेख करताना आमदार जोरगेवार म्हणाले कीअनेक वर्षांपासून घुग्घूसचा कारभार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालत होता. मात्र ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असतानाही शहराला नगर परिषदेचा दर्जा नव्हता. घुग्घूसच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन येथे नगर परिषद स्थापन व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश मिळून घुग्घूस नगर परिषदेची स्थापना झाली. त्यामुळे शहरातील नागरी सुविधा आणि विकासकामांना अधिक व्यापक स्वरूप मिळाले आहे.

            घुग्घूसमधील उड्डाणपूल आणि आता ग्रामीण रुग्णालय हे शहराच्या विकासाच्या दिशेने पडलेले महत्त्वाचे टप्पे आहेत. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधाआरोग्य सेवा आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देत घुग्घूसला अधिक विकसित शहर म्हणून पुढे नेण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील. विकासाची ही गती कायम ठेवत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular