चंद्रपूर :- भारताचे यशस्वी पंतप्रधान तथा देशगौरव माननीय नरेंद्र मोदी यांच्या 76 व्या जन्मदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) तसेच पक्षाच्या विविध आघाड्यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. Milk distribution by the BJP on the occasion of Prime Minister Narendra Modi’s birthday
दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गिरनार चैकातील हंसराज अहीर Hansraj Ahir यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
राजुरा बहुचर्चित पापा जाधव हत्याकांडातील सहाव्या आरोपीला अटक…..
यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच निरामय व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या आरोग्याचा संदेश देत कार्यक्रमस्थळी आरोग्यदायी हळदीच्या दुधाचे वाटप करण्यात आले. हळदीच्या दुधाचे आरोग्यविषयक महत्त्व सांगत नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. चंद्रपूर पोलीस दलात 14 नवीन वाहने दाखल………
भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्या नेतृत्वात आयोजित जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळाप्रसंगी चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, भाजपा चंद्रपूर ग्रामिण तालुकाध्यक्ष विनोद खेवले, ओबीसी मोर्चा महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, भाजपा चंद्रपूर महानगरचे महामंत्री शाम कनकम, तुषार सोम, बलराम डोडाणी, विकास खटी, मोहन चौधरी, गौतम यादव, सुदामा यादव, सुभाष आदमने, राजेश वाकोडे, राजवीर चौधरी, पराग मलोडे, अवधेश यादव, राजू घरोटे, पुनम तिवारी, ललीत गुलानी, राजू येले, कमल कजलीवाले, राहुल सुर्यवंशी, सलीम शेख, राहुल गायकवाड, प्रविण चुनारकर, अंजय्या मातंगी, तुषार मोहुर्ले, शैलेश दिंडेवार, सुबोध चिकटे यांचेसह भाजपा, भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
