Wednesday, September 9, 2026
HomeCrimeनागपूरची चोरीची बाईक चंद्रपुरात जप्त

नागपूरची चोरीची बाईक चंद्रपुरात जप्त

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB पथकाने चोरीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जप्त केली. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, जप्त मोटारसायकल नागपूर जिल्ह्यातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. Stolen bike from Nagpur seized in Chandrapur

राहूल गांधींवरील FIR विरोधात काँग्रेसचा एल्गार…….

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या चंद्रपूर उपविभाग पथकाला चोरीच्या मोटारसायकलीबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पथकाने चंद्रपूर शहर परिसरात शोधमोहीम राबवून दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून हिरो होंडा स्प्लेंडर प्लस, नोंदणी क्रमांक MP-20-MH-8135, अंदाजे ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. Chandrapur Crime

जप्त मोटारसायकलबाबत अधिक तपास केला असता, ती पोलीस ठाणे वाडी, जिल्हा नागपूर येथील अपराध क्रमांक ५६३/२०२६, कलम ३०३(२), भारतीय न्याय संहिता अंतर्गत नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले.

या कारवाईत गोपाल ऊर्फ कोब्रा जीवन मालाकर (वय २७, रा. इंदिरानगर, चंद्रपूर) आणि यमला तंगराज कोरवान (वय ३५, रा. इंदिरानगर, चंद्रपूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
सदर दोन्ही आरोपी तसेच जप्त करण्यात आलेली मोटारसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी वाडी पोलीस ठाणे, जिल्हा नागपूर यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या चंद्रपूर उपविभाग पथकाने केली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular