Friday, September 4, 2026
HomeCulturalचंद्रपूर दीक्षाभूमीच्या मुक्तीसाठी १६ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा

चंद्रपूर दीक्षाभूमीच्या मुक्तीसाठी १६ सप्टेंबरला आक्रोश मोर्चा

चंद्रपूर : ऐतिहासिक चंद्रपूर दीक्षाभूमीच्या विकासासाठी तसेच दीक्षाभूमी व्यवस्थापनातून ‘परिवारशाही’ दूर करण्याच्या मागणीसाठी १६ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा ‘दीक्षाभूमी मुक्ती जनआंदोलन, चंद्रपूर’च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. ‘Akrosh Morcha’ for the liberation of Chandrapur Dikshabhumi

वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर, 52 वाहनांवर कारवाई…...

हा मोर्चा चंद्रपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूरच्या पवित्र भूमीत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या आग्रहाखातर सुमारे तीन लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. बाबासाहेबांच्या जीवनातील हा अखेरचा धम्मदीक्षा सोहळा असल्याने चंद्रपूर दीक्षाभूमीला जागतिक स्तरावर विशेष महत्त्व असल्याचे आंदोलकांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मात्र, गेल्या ३६ वर्षांपासून दीक्षाभूमी किंवा बुद्धविहाराचा अपेक्षित विकास झालेला दिसत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

बल्लारपूरात पहिले जिल्हा आरोग्य साहित्य संमेलन…….

दीक्षाभूमीचा सर्वांगीण विकास व्हावा, ही बौद्ध-आंबेडकरी समाजाची भावना असून या प्रश्नावर मागील वर्षभरापासून युवकांकडून स्वाक्षरी अभियान आणि जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. बांधकाम सुरू असलेल्या घरी घरफोडी, आरोपी LCB च्या ताब्यात…..

चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजुरा तालुक्यांत बैठका घेतल्यानंतर १७ ऑगस्ट २०२६ रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे शेकडो बौद्ध अनुयायांच्या उपस्थितीत व्यापक आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन १५ व १६ ऑक्टोबरच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात समाजाचा सहभाग, दीक्षाभूमी-बुद्धविहार विकास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या व्यवस्थापनातील कथित परिवारशाही यासंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.
दरम्यान, दीक्षाभूमी विकास आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने बैठक घेण्यात आली होती. मात्र, विविध तालुक्यांतून व वॉर्डांतून आलेल्या समाजबांधवांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा दावा आंदोलकांनी केला. त्यामुळे जनतेच्या वतीने आता आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. खासदारांचा सरप्राइज विजिट……

जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यांचे निवेदन
१६ सप्रोटेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाद्वारे दीक्षाभूमीचा विकास, बुद्धविहाराचा विकास, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम समाजाच्या सहभागातून आयोजित करणे तसेच व्यवस्थापनातील कथित परिवारशाहीबाबत शासन-प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशा विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्यात येणार आहेत. चंद्रपुरात विदर्भ स्तरीय दहीहंडी स्पर्धा……

मोर्चाच्या आयोजनात प्रतीक डोर्लीकार, राजस खोब्रागडे, लुंबिनी गणवीर, प्रियांका चव्हाण, हर्षल खोब्रागडे, अशोक फुलझेले, सुरेश नारनवरे, अशोक टेंबरे, जितेंद्र डोहने, राजकुमार जवादे, मृणाल कांबळे, गीता रामटेके, निर्मला नगराळे, प्रेरणा करमरकर, नम्रता रायपुरे, अमिष मेश्राम, मयूर साखरे, सुमित गोडघाटे, प्रतीक वाघमारे, राज बडोले, प्रमीला झोडापे, दीक्षा थूल, श्रेया राऊत, चारिका भगत, भंते अनिरुद्ध थेरो, देशक खोब्रागडे, सिद्धार्थ शेंडे, राजेश रंगारी, करण सोमकुंवर, हरिदास देवगडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular