- बोधिसत्व बुद्ध विहाराच्या संरक्षणासाठी ७ सप्टेंबरपासून आमरण उपोषण
Lloyds Metal Company ला दिलेली NOC रद्द करण्याची समितीची मागणी; बोधी वृक्ष व धम्मध्वजाच्या संरक्षणासाठी आंदोलन
चंद्रपूर :- घुग्घुस शहरातील शांतीनगर येथील बोधिसत्व बुद्ध विहार व ध्यान साधना केंद्र, परिसरातील पवित्र बोधी वृक्ष तसेच धम्मध्वजाच्या संरक्षणाच्या मागणीसाठी बोधिसत्व बुद्ध विहार व ध्यान साधना केंद्र समितीच्या वतीने ७ सप्टेंबर २०२६ पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्ष भंते रत्नमनी थेरो हे आमरण उपोषणास बसणार आहेत.
शांतीनगर येथील बौद्ध विहारासंदर्भात Lloyds Metal Company ला देण्यात आलेली NOC तात्काळ रद्द करावी, अशी समितीची प्रमुख मागणी आहे. त्यासोबतच बोधिसत्व बुद्ध विहार व ध्यान साधना केंद्र, परिसरातील पवित्र बोधी वृक्ष आणि धम्मध्वजाचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. चंद्रपुरात गांजा तस्करी, 3 आंतरराज्यीय आरोपी जेरबंद, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
बौद्ध विहार हे केवळ धार्मिक स्थळ नसून बौद्ध समाजाच्या श्रद्धा, धम्म आचरण, ध्यान साधना आणि सामाजिक एकतेचे केंद्र असल्याचे समितीने म्हटले आहे. विहार परिसरातील बोधी वृक्षाला बौद्ध समाजात विशेष धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व असून धम्मध्वज हा भगवान बुद्धांच्या धम्माचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या तिन्हींचे अस्तित्व आणि परिसरातील धार्मिक वातावरण अबाधित ठेवणे आवश्यक असल्याचे समितीचे म्हणणे आहे. आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या विषबाधा, कारवाई करा अन्यथा आंदोलन… NSUI

या प्रश्नासंदर्भात प्रशासन, नगर परिषद तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने देऊन आणि बैठका घेऊन सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नसल्याने समितीने लोकशाही व संविधानिक मार्गाने शांततामय आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर रेल्वेला नवी गती, इंटरसिटी एक्सप्रेस, वर्धा पॅसेंजर, काजीपेठ…..
या आहेत प्रमुख मागण्या
समितीने शांतीनगर बौद्ध विहारासंदर्भात Lloyds Metal Company ला देण्यात आलेली NOC रद्द करावी, बोधिसत्व बुद्ध विहार व ध्यान साधना केंद्राचे संरक्षण करावे, पवित्र बोधी वृक्ष व धम्मध्वजाचे संरक्षण करावे, तसेच विहार परिसरातील धार्मिक व आध्यात्मिक वातावरण अबाधित ठेवावे, अशी मागणी केली आहे.
तसेच विहार, बोधी वृक्ष व धम्मध्वजाच्या अस्तित्वाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची प्रशासनाने खात्री करावी, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कायदेशीर निर्णय घ्यावा आणि बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना व संविधानिक अधिकारांचा सन्मान करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. चंद्रपुरात गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी….
७ सप्टेंबरपासून आंदोलन
हे आमरण उपोषण ७ सप्टेंबर २०२६ पासून शांतीनगर बोधिसत्व बुद्ध विहार परिसर, घुग्घुस येथे सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भंते रत्नमनी थेरो करणार असून बोधिसत्व बुद्ध विहार व ध्यान साधना केंद्र समितीच्या वतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
समितीचे कार्याध्यक्ष सुमेध पाटील, उपाध्यक्ष भंते संघरक्षीत थेरो, भंते अम्मतम, भंते शिलरक्षीत व भारती निमसटकर, कोषाध्यक्ष प्रज्योत गोरघाटे, सचिव भिमेंद्र कांबळे, सहकोषाध्यक्ष ममता निमसटकर, सहसचिव सविता मडपे व माला मेश्राम यांच्यासह समितीचे पदाधिकारी व सदस्य आंदोलनात सहभागी होणार आहेत.
नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
बोधिसत्व बुद्ध विहार, पवित्र बोधी वृक्ष आणि धम्मध्वजाच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात येणाऱ्या या शांततामय व संविधानिक आंदोलनाला बौद्ध समाजबांधव, घुग्घुसकर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन बोधिसत्व बुद्ध विहार व ध्यान साधना केंद्र समिती, शांतीनगर, घुग्घुस यांच्या वतीने करण्यात आले आहे.
