चंद्रपूर :- आंतरराज्यीय गांजा तस्करी विरोधात चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने LCB मोठी कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून १७.४७५ किलो गांजा, गांजा सदृश्य वनस्पती, चारचाकी वाहन आणि चार मोबाईल असा एकूण १७ लाख ८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Local Crime Branch Chandrapur
चंद्रपूर रेल्वेला नवी गती, इंटरसिटी एक्सप्रेस, वर्धा पॅसेंजर, काजीपेठ…..
दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली होती की, काही इसम ओडिशा येथून गांजा घेऊन चारचाकी वाहनाने येत असून, हा गांजा विक्रीसाठी नेला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे बल्लारपूर – राजुरा मार्गावरील बामणी चौक परिसरात सापळा रचण्यात आला. चंद्रपुरात गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी…..
पोलिसांनी संशयित चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळून आला. या कारवाईत अमोल रमेश कांबळे (वय ३३, रा. एरंडी सरोडा, ता. औसा, जि. लातूर), सदानंद रविंद्र जना (वय ३२, रा. साखोरिया, ता. खल्लीकोट, जि. गंजाम, ओडिशा) आणि ओंगा बिरा कोवासी (वय २८, रा. बौपनपल्ली, ता. कालीमेल, जि. मलकानगिरी, ओडिशा) यांना ताब्यात घेण्यात आले. गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार…..
यावेळी आरोपींकडून एमएच-२४ बीआर-९२८२ क्रमांकाची चारचाकी, १७.४७५ किलो गांजा व चार मोबाईल असा एकूण किंमत १७,०८,७५० रुपयांचा जप्त करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 12 सप्टेंबर रोजी लोक अदालत……
याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काटकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक काम्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, सफौ स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, गणेश भोयर, रामराव बिगेवाड, शरद कुडे, रजनीकांत पुट्टावार, सचिन गुरनुले, सुभाष गोहोकर, पोअं प्रतीक हेमके, विठ्ठल काकडे, प्रफुल्ल पुप्पलवार, पोशी दिनेश अराडे आदींनी केली.
