Friday, October 16, 2026
HomeAgricultureप्रकल्प प्रभावित सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी द्यावी

प्रकल्प प्रभावित सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी द्यावी

चंद्रपूर :- वेकोलि खाण प्रभावित क्षेत्रातील सुशिक्षित व व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या बेरोजगार युवकांना क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत खासगी कंपन्यांमध्ये राज्य शासनाच्या 80/20 या धोरणानुसार रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष, युवा नेते रघुवीर अहीर यांनी दि. 20 ऑगस्ट 2026 रोजी वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक संजय मिश्रा यांचेशी झालेल्या चर्चेतून केली. आंदोलनकर्त्या युवक युवतींशी दोन दिवस चर्चा…..

          वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्राशी निगडीत अनेक गावांमध्ये सुशिक्षित बेरोजगार मोठ्या संख्येत असतांना त्यांना स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या कंपन्यांमध्ये रोजगार नाकारल्या जात आहे. या उलट परप्रांतीयांना नोकऱ्या देऊन स्थानिकांवर अन्याय केला जात आहे. महा वॉकथॉन आणि रिल्स स्पर्धेचेही आयोजन……

प्रकल्प पिडीत गावात अनेक सुशिक्षित युवक बेरोजगारीचे जीवन जगत आहेत, अनेक युवकांनी आयटीआय व अन्य संस्थातून व्यावसायिक प्रशिक्षण घेतले असतांना त्यांना रोजगारापासून डावलणे योग्य नसून या प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी देऊन न्याय द्यावा अशी मागणी या भेटीदरम्यान रघुवीर अहीर यांनी वेकोलि क्षेत्रीय महाप्रबंधक व अन्य संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. महिला होणार कारपेंटर……

          प्रस्तुत मागणी योग्य असल्याचे मान्य करून प्रकल्प प्रभावित गावातील सुशिक्षित व व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या बेरोजगार युवकांना रोजगारात प्राधान्य देण्याचे आश्वासन क्षेत्रीय महाप्रबंधकांनी या चर्चेदरम्यान दिले. याबाबत लवकरच निर्णय घेऊन स्थानिकांना रोजगार दिला जाईल असेही त्यांनी या भेटीदरम्यान स्पष्ट केले. पोक्सो, बालविवाह व बाल न्याय विषयावर बैठक……

स्थानिकांच्या न्यायासाठी, रोजगार संधीसाठी व युवकांच्या भविष्यासाठी सतत पाठपुरावा केला जाईल असेही रघुवीर अहीर यांनी या चर्चेप्रसंगी सांगितले. राजीव गांधींच्या दूरदृष्टीमुळे देशात तंत्रज्ञान क्रांती…..

          रघुवीर अहीर यांच्या नेतृत्वात क्षेत्रीय महाप्रबंधकांसोबत भेटलेल्या शिष्टमंडळात सर्वश्री. नगरसेवक गणेश पिंपळकर, मयुर भोकरे, पवन पुरेल्ली, इंद्रजीत, सलीम शेख, शैलेश दिंडेवार, सुरज मोरपाका, रमन तांद्रा, वंशी महाकाली, अनुप भंडारी, रवि देवगीरकर, रक्षित सुंदरगीरी आदींची उपस्थिती होती.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular