Monday, August 17, 2026
HomeAccidentबाळासाहेब ठाकरे गेट चौकात अखेर सिग्नल ; भद्रावतीकरांच्या मागणीला यश

बाळासाहेब ठाकरे गेट चौकात अखेर सिग्नल ; भद्रावतीकरांच्या मागणीला यश

भद्रावती :- शहरातील बाळासाहेब ठाकरे गेट चौकातील चारही रस्त्यांवर सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चौकात वाहतूक सिग्नल बसविण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन या ठिकाणी सिग्नल व्यवस्था करण्याची मागणी लावून धरली होती. Traffic signal finally installed at Thackeray Gate Square >> चंद्रपूर पोलिसांची दमदार कारवाई 3 कोटी 59 लाखांचा मुद्देमाल मालकांच्या स्वाधीन…….

या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, १५ ऑगस्ट रोजी बाळासाहेब ठाकरे गेट चौकात सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे चौकातील वाहतूक सुरळीत होण्यासोबतच अपघातांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आश्रमशाळांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश…..

बाळासाहेब ठाकरे गेट चौक हा चारही दिशांना जाणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा मार्ग असून, येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. सिग्नलअभावी अनेकदा वाहतूक कोंडी तसेच वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघातांचा धोका वाढला होता. त्यामुळे सिग्नलची मागणी नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली होती. भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश……

अखेर प्रशासनाने या मागणीची दखल घेत सिग्नल व्यवस्था सुरू केल्याने भद्रावतीकरांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे तसेच या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सर्व पक्ष, संघटना आणि नागरिकांचे आभार मानले.

अपघातांना आळा बसून बाळासाहेब ठाकरे गेट चौक अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular