चंद्रपूर :- डॉ. गंगारामजी अहीर चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूरच्या वतीने स्व. कालिदास गंगारामजी अहीर व स्व. हितेंद्र गंगारामजी अहीर यांच्या जयंती स्मृती प्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार, दि.14 ऑगस्ट 2026 रो जी सकाळी 9.00 वाजता पासून महेश भवन, तुकूम, चंद्रपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Blood donation camp organized by Dr. Gangaramji Ahir Charitable Trust
अहीर परिवार व मित्र मंडळींच्या पुढाकारातून होत असलेल्या या रक्तदान शिबिरास सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
तरी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवक, युवतींनी रक्तदानाच्या या पवित्र व राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन आपले अमुल्य योगदान द्यावे असे आवाहन डॉ. गंगारामजी अहीर चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.
