Blood donation camp organized by JCI Powercity; 20 units of blood collected
चंद्रपूर : JCI चंद्रपूर पॉवरसिटीच्या वतीने “Lead • Connect • Evolve 2026” या वार्षिक थीमअंतर्गत 26 जून रोजी संजीवन ब्लड बँक, चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात 20 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. Blood donation camp organized by JCI Chandrapur Powercity
या शिबिरात JCI चंद्रपूर पॉवरसिटीच्या सात सदस्यांनी स्वखुशीने रक्तदान करून समाजासमोर सेवाभावाचा आदर्श निर्माण केला. रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यातून गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. भाजपाच्या वतीने घुग्घुस येथे भव्य निशुल्क आरोग्य शिबिर…….
JFS डॉ. अमित पोर्रेडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने हा उपक्रम पार पडला. क्लबच्या अध्यक्षा JCI सिनेटर सोनम कपूर यांच्या नेतृत्वाखाली प्रोजेक्ट डायरेक्टर JC अनिकेत गुज्जेवार, डायरेक्टर कम्युनिटी डेव्हलपमेंट JC रश्मी पित्तुलवार, डॉ. रीमा निनावे, JC अंकित निनावे आणि JC खुशी निनावे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. याशिवाय JC अनूपा भांबरी, JC अमोल बल्लावार, JC सचिन पित्तुलवार आणि JC रितुल नागराले यांनीही या उपक्रमात मोलाचे योगदान दिले.
दरम्यान, “Street to Society – Sustainable Sipping Project” अंतर्गत क्लबच्या वतीने संजीवन ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांना कौतुकाची भेट म्हणून स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
सामाजिक उत्तरदायित्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.