Saturday, June 27, 2026
HomeEmploymentमनपा सफाई कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला बसपाचा जाहीर पाठिंबा

मनपा सफाई कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला बसपाचा जाहीर पाठिंबा

BSP supports the hunger strike by municipal sanitation workers

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतील MNC सफाई कुली, सफाई रेजा (सफाई कामगार) व त्यांच्या वारसांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला बहुजन समाज पार्टीने जाहीर पाठिंबा दिला आहे. BSP supports the hunger strike CMC Sanitation Workers

शनिवारी बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व त्यांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.

चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालयासमोर २२ जूनपासून सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान बसपाच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्ते, आंदोलनकर्ते व उपस्थित नागरिकांशी सविस्तर संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वारस नियुक्ती, सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, शासन निर्णय व न्यायालयीन आदेशांची त्वरित अंमलबजावणी करून सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी भूमिका पक्षाच्या वतीने मांडण्यात आली. तसेच या मागण्यांसंदर्भात महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

उपोषणकर्त्यांनी अनेक वर्षांपासून वारस नियुक्तीसह विविध न्याय्य मागण्या प्रलंबित असल्याने अखेर बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे सांगितले. यावर बहुजन समाज पार्टीने आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी केली.

यावेळी बसपाचे प्रदेश महासचिव तथा विदर्भ झोन इन्चार्ज डॉ. मोहन राईकवार, विदर्भ प्रदेश सचिव तथा चंद्रपूर जिल्हा इन्चार्ज इंजि. महेंद्र मकेश्वर, लोकसभा प्रभारी धर्मेश निकोसे, जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ लाडे, जिल्हा सचिव संजय मेश्राम, शहराध्यक्ष इंजि. विमित कोसे, शहर महासचिव कार्तिक वनकर, माजी अध्यक्ष किशन केशकर यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular