Saturday, June 27, 2026
HomeHealthसुरेंद्र अडबाले यांना पितृशोक

सुरेंद्र अडबाले यांना पितृशोक

सुरेंद्र अडबाले यांना पितृशोक

चंद्रपूर :- आमदार सुधाकर अडबाले यांचे काका तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे चंद्रपूर महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले यांचे वडील विठ्ठलराव झित्रुजी अडबाले (वय 84) यांचे शुक्रवार, दि. 26 जून 2026 रोजी रात्री 10 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने अडबाले कुटुंबासह सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि आप्तपरिवार असा मोठा परिवार आहे.

स्वर्गीय विठ्ठलराव अडबाले यांच्या पार्थिवावर शनिवार, दि. 27 जून रोजी सकाळी 11 वाजता शांतीधाम, चंद्रपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांची अंत्ययात्रा जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर येथील निवासस्थानावरून निघणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular