Sunday, June 21, 2026
HomeAgricultureसेंद्रिय शेतीला चालना

सेंद्रिय शेतीला चालना

Promoting Organic Farming: ‘Trap Crop’ Demonstration and Seed Distribution by Dhariwal Infrastructure

चंद्रपूर :- धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, चंद्रपूर आणि विकासगंगा समाजसेवी संस्था, घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘सेंद्रिय शेतीद्वारे आधारित पर्यावरणपूरक शाश्वत शेती’ (वसुंधरा) प्रकल्पांतर्गत सापळा पीक प्रात्यक्षिक तसेच कापूस व तूर बियाणे, ट्रायकोड्रमा, पीएसबी आणि एझोटोबॅक्टर वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. ‘Trap Crop’ Demonstration and Seed Distribution

गेल्या एका वर्षापासून पांढरकवडा, वढा, धानोरा, सोनेगाव, शेणगाव, अंतूर्ला, येरूर, मोरवा, चारगाव आणि ताडाळी या दहा गावांमध्ये ‘वसुंधरा’ प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. Promoting Organic Farming

कार्यक्रमाचे आयोजन देवेश कुमार (मुख्य महाप्रबंधक, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी सापळा पिकांचे महत्त्व आणि त्याचे फायदे याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सापळा पीक हे कीटकांना आकर्षित करून मुख्य पिकांचे संरक्षण करते. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होऊन पर्यावरणाचे संवर्धन होते. तसेच मित्र कीटकांची संख्या वाढून नैसर्गिकरित्या कीड नियंत्रणास मदत मिळते. परिणामी मुख्य पिकांचे संरक्षण होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिष नायर (मुख्य व्यवस्थापक), प्रतीक वानखेडे (उपव्यवस्थापक), सुरज तोतडे (सरपंच, पांढरकवडा), धनंजय दळवी (प्रकल्प समन्वयक), मिथून कलसार (क्षेत्र प्रवर्तक) यांची उपस्थिती लाभली. याशिवाय कृषी सखी, प्रकल्पाशी संबंधित कर्मचारी तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीविषयी जागरूकता निर्माण होऊन पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular