Monday, June 8, 2026
HomeHealthविसापूर येथे आरोग्य शिबिर - ३६३ नागरिकांची तपासणी

विसापूर येथे आरोग्य शिबिर – ३६३ नागरिकांची तपासणी

Health Camp at Visapur – 363 Citizens Examined

चंद्रपूर :- जनतेच्या आरोग्याची काळजी ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून लोकप्रतिनिधी म्हणून आपलेही कर्तव्य आहे, या भावनेतून आमदार सुधीर मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar सातत्याने आरोग्यविषयक उपक्रम राबवत असतात. त्याच संवेदनशीलतेतून विसापूर येथील वस्ती व टेकडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. Health Camp at Visapur

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात ३६३ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जनतेच्या आरोग्याविषयी असलेली आ. सुधीर मुनगंटीवार यांची तळमळ, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याची त्यांची बांधिलकी आणि लोककल्याणाचा ध्यास याचेच हे आणखी एक प्रभावी उदाहरण ठरले आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आणि श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर यांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, नाक-कान-घसा, अस्थिरोग, त्वचारोग तसेच श्वसनविकार अशा विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन केले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बहुविशेषज्ञ आरोग्यसेवेचा लाभ आपल्या गावातच मिळाला.

शिबिरादरम्यान एकूण ३६३ रुग्णांची नोंदणी झाली. तपासणीनंतर डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसह विविध आजारांवरील उपचारांसाठी ६० रुग्ण पात्र ठरले असून त्यांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वानाडोंगरी येथे पाठविण्यात येणार आहे. तसेच ११२ लाभार्थी मोफत चष्म्यासाठी पात्र ठरले असून पुढील चार दिवसांत त्यांना चष्म्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील एकही नागरिक उपचाराअभावी वंचित राहू नये, या ध्येयातून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात पुढील एक महिना सलग अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचा संकल्प केला आहे. विकासकामांसोबतच नागरिकांचे आरोग्य जपणे हीदेखील लोकप्रतिनिधीची महत्त्वाची जबाबदारी असल्याची त्यांची भूमिका असून त्यातूनच अशा उपक्रमांना सातत्याने चालना मिळत आहे.

जनतेसाठी निःस्वार्थ धडपड
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आयोजित विविध आरोग्य शिबिरांमधून आजपर्यंत तब्बल ३५ हजार नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय १५ हजारांहून अधिक रुग्णांच्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य करण्यात आल्या आहेत. हजारो कुटुंबांच्या आयुष्यात नव्या प्रकाशाची किरणे पोहोचविणाऱ्या या उपक्रमांमधून जनसेवेचा आ.मुनगंटीवार यांचा ध्यास आणि नागरिकांच्या आरोग्याविषयीची तळमळ अधोरेखित होत आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून आ. सुधीर मुनगंटीवार आरोग्यसेवेच्या माध्यमातूनही समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी सातत्याने जपत आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular