Tuesday, May 26, 2026
HomeAccidentमोबाईलवर ‘एक्स्ट्रीम अलर्ट’ ; विदर्भात उष्णतेचा धोका वाढला

मोबाईलवर ‘एक्स्ट्रीम अलर्ट’ ; विदर्भात उष्णतेचा धोका वाढला

‘Extreme Alert’ on Mobile Phones; Heat Threat Intensifies in Vidarbha

चंद्रपूर :- विदर्भातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरसह अमरावती, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांच्या मोबाईलवर गुरुवारी दुपारनंतर “Extremely Severe Alert” असा विशेष इशारा संदेश प्राप्त झाला. अचानक आलेल्या या अलर्टमुळे नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. ‘Extreme Alert’ on Mobile Phones

मंत्रालय, मुंबई यांच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या या संदेशात पुढील २४ तासांत संबंधित जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी रात्रीदेखील उष्णता कायम राहण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. Warning of ‘Extreme Heat’ Issued to Mobile Users Across Vidarbha, Including Chandrapur

मोबाईलवर आलेल्या या आपत्कालीन संदेशामध्ये नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, सतत वाढणाऱ्या तापमानामुळे चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनही सतर्क झाले असून आरोग्य यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular