Friday, May 22, 2026
HomeAccidentसिंदेवाही जंगलात वाघाचा थरारक हल्ला ; चार महिला ठार

सिंदेवाही जंगलात वाघाचा थरारक हल्ला ; चार महिला ठार

Thrilling Tiger Attack in Sindewahi Forest; Four Women Killed

चंद्रपूर :- सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात शुक्रवारी (दि. २२ मे) सकाळच्या सुमारास तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने भीषण हल्ला चढवून त्यांना जागीच ठार केल्याची हृदयद्रावक घटना घडली. Thrilling Tiger Attack in Sindewahi

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभाग आणि पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील महिला दररोजप्रमाणे पहाटे तेंदूपत्ता संकलनासाठी गुंजेवाही जंगलात गेल्या होत्या. जंगलात तेंदूपत्ता गोळा करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ४५ वर्षीय कवडूबाई दादाजी मोहुर्ले, ४० वर्षीय अनिताबाई दादाजी मोहुर्ले, ५० वर्षीय संगीता संतोष चौधरी आणि ३८ वर्षीय सुनीता कौशिक मोहुर्ले यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी जंगल परिसरात धाव घेतली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सदर हल्ला एकाच वाघाने केला की परिसरात आणखी वाघ आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

या दुर्दैवी घटनेमुळे गुंजेवाही परिसरात शोककळा पसरली असून तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular