Conduct a High-Level Inquiry into the NEET Paper Leak Scandal
चंद्रपूर :- बहुजन समाज पार्टी (BSP) चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे नीट (NEET-UG) परीक्षेमध्ये झालेल्या कथित पेपरफुटी व गैरव्यवहार प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पंतप्रधानांना सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे देशातील लाखो मेहनती व होतकरू विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या गैरव्यवहारांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून विद्यार्थ्यांवर मानसिक, आर्थिक व शैक्षणिक ताण वाढत असल्याचे बीएसपीने नमूद केले आहे. Conduct a High-Level Inquiry into the NEET Paper Leak Scandal
बीएसपीच्या वतीने नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) मधील सुरक्षा व्यवस्था व उत्तरदायित्व अधिक मजबूत करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असल्यास पारदर्शक पद्धतीने पुनर्परीक्षा घेण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. BSP Demands of the Prime Minister
बीएसपीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गरीब, ग्रामीण, मागासवर्गीय, दलित आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थी अशा घटनांमुळे सर्वाधिक प्रभावित होत आहेत. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतरही परीक्षा प्रक्रियेत होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरत आहे. विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही पक्षातर्फे देण्यात आला.
निवेदन सादर करताना लोकसभा प्रभारी धर्मेश निकोसे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ लांडे, बीएसपी संघटक डॉ. ज्ञानेश्वर राऊत, जिल्हा सचिव संजय मेश्राम, कोषाध्यक्ष मनोहर साखरे, वरिष्ठ कार्यकर्ते नवनंद खंडाडे, शहर अध्यक्ष इंजी. विमित कोसे, शहर महासचिव कार्तिक वनकर, विलास उंदीरवाडे व जयकुमार देवताडे आदी उपस्थित होते