Burglary ‘Mastermind’ Finally Nabbed; Three Crimes Cracked
चंद्रपूर :- घुग्घुस व मुल परिसरात घरफोडी करून दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरने अखेर बेड्या ठोकत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून तब्बल १७ लाख ७८ हजार २२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Hardcore Burglar Apprehended
पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुल पोलीस ठाण्यात दाखल घरफोडी प्रकरणातील आरोपी अमोल इलमकर (रा. दुर्गापूर) हा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषण व चौकशीत आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली. Chandrapur LCB
चौकशीदरम्यान आरोपीकडून १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच घुग्घुस पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील १ किलो ४११ ग्रॅम चांदीचे दागिने एका महिलेकडून हस्तगत करण्यात आले.
याशिवाय आरोपीने मुल परिसरातील मंदिरातील चोरीचीही कबुली दिली.
या कारवाईत आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले. अशाप्रकारे एकूण तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून मोठ्या प्रमाणावर चोरीचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनिल गौरकार, पोहवा रजनिकांत पुठ्ट्टावार, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, गणेश मोहुर्ले, दिनेश अराडे, नितीन कुरेकार, नितीन साळवे, प्रमोद कोटनाके, सुरेंद्र मंहतो, निराशा तितरे, उषा लेडांगे, प्रफुल्ल गारघाटे, शेखर माथनकर, अमोल सावे तथा पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयम, दक्षता आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर कारवाई यशस्वी केली.