Wednesday, April 22, 2026
HomeMaharashtraछत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे...

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे भव्य आयोजन

Grand Celebration of the Birth Anniversaries of Chhatrapati Shivaji Maharaj, Mahatma Jyotiba Phule, and Dr. Babasaheb Ambedkar

चंद्रपूर :- शहरातील बाबूपेठ परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर प्रभागात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे राहणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थितीत मा. प्रा. श्री. जोगेंद्र कवाडे, मा. श्री. जयदीपजी कवाडे, श्रद्धेय भदंत सुमनवन्नो महास्थवीर यांची उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. संगीताताई खांडेकर, महापौर चंद्रपूर मनपा, श्री. राहुलभाऊ पावडे, श्री. बृजभूषण पांडे, श्री. आकाशभाऊ ठुसे, श्री. अमोलभाऊ रामटेके, श्री. जितू करमरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विशेष अतिथी म्हणून अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन श्री. अनिल रामटेके यांनी तर शिल्पसृष्टीचे काम श्री. सिद्धार्थ दुबे यांनी साकारले आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. धनंजय तावाडे करणार आहेत.

या भव्य सोहळ्याचे आयोजन श्री. अनिल प्रल्हाद रामटेके (माजी नगरसेवक) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, विविध सहकार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत.

जयंती उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक एकात्मता, प्रेरणा आणि महापुरुषांच्या विचारांचा जागर जागर प्रचार करण्याचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular