Thursday, April 16, 2026
HomeEducationalइन्फंट जिजस हायस्कूलचा सीबीएसई दहावीमध्ये १००% निकाल

इन्फंट जिजस हायस्कूलचा सीबीएसई दहावीमध्ये १००% निकाल

Infant Jesus High School Achieves 100% Result in CBSE Class 10

चंद्रपूर :- सीबीएसई इयत्ता दहावीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात इन्फंट जिजस सोसायटीद्वारे संचालित इन्फंट जिजस हायस्कूल, राजुरा येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करत शाळेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. यंदाही शाळेचा १०० टक्के निकाल लागला असून सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

या निकालात कु. आनंदी रंजन लांडे हिने ९४.४०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. अलेश लेखराज देठे याने ९३.८०% गुणांसह द्वितीय, तर साई संतोष शिंदे याने ९२.४०% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय कु. मधुरा अविनाश गिरडकर – ९२%, अर्नव शालिक पोडे – ९१.२०%, कु. ज्ञानदीपा राजेश वांढरे – ९१%, कु. वृशाली गणपत पहानपटे – ९०.४०%, भुवन रमेश कावळे – ९०% आदी विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणीत यश मिळविले आहे. परिक्षेला एकुण ५५ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तम गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, सचिव नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, सर्व संचालक, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व नागरिकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular