Unique offer from ‘Aicha Swayampak Grih’ on the occasion of April 14th – Buttermilk for just Rs. 5
चंद्रपूर :- वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आईच्या स्वयंपाक गृह, चंद्रपूर तर्फे थंड पेयांची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे ताक, पन्हा आणि लस्सी यांसारखी आरोग्यदायी पेये उपलब्ध असून, ती शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्याने विविध आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. अशावेळी ताक, पन्हा व लस्सी यांसारख्या पारंपरिक पेयांचे सेवन केल्यास शरीराला थंडावा मिळतो, पचनक्रिया सुधारते तसेच डिहायड्रेशनपासून संरक्षण होते. त्यामुळे नागरिकांकडून या पेयांना विशेष पसंती दिली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर १४ एप्रिल (भीम जयंती) Bhim Jayanti निमित्त ‘आईच्या स्वयंपाक गृह’तर्फे विशेष ऑफर जाहीर करण्यात आली असून, फक्त ५ रुपयांत ताक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरात प्रथमच अशा प्रकारची आकर्षक व परवडणारी ऑफर उपलब्ध होत असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. Buttermilk for just Rs. 5
ही विशेष सुविधा शहरातील दोन्ही शाखांमध्ये उपलब्ध राहणार असून नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सहव्यवस्थापक प्रणित नामदेव तोडे यांनी केले आहे.
पत्ता :
• CDCC बँक समोर, वनविभाग कार्यालयाजवळ, चंद्रपूर
• वरोरा नाका, शासकीय आयटीआय जवळ, चंद्रपूर