Wednesday, April 15, 2026
HomeCrimeदोन डंपर हडप करून गॅस कटरने केले तुकडे

दोन डंपर हडप करून गॅस कटरने केले तुकडे

Truck Fraud Racket Busted in Bhadravati

भद्रावतीत ट्रक फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश
🔍 दोन डंपर हडप करून गॅस कटरने केले तुकडे; घुग्घुस पोलिसांची धडक कारवाई

चंद्रपूर :- भद्रावती येथील एका व्यावसायिकाची फसवणूक करून दोन ट्रक हडप करणाऱ्या टोळीचा घुग्घुस पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ट्रकचे तुकडे करून विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात नागपूर येथून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सध्या छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात आहे. Truck Fraud Racket Busted in Bhadrawati

फिर्यादी गोविंद अतुल कुंडू (रा. भद्रावती) यांच्या मालकीचे टाटा डंपर (क्रमांक MH-29-BE-1656 व MH-29-BE-1657) हे आरोपी साबीर अली सिराजउद्दीन सय्यद (रा. घुग्घुस) याने खरेदीच्या बहाण्याने नोटरीद्वारे ताब्यात घेतले. मात्र ठरलेली रक्कम न देता फसवणूक करून दोन्ही ट्रक लंपास केले.

या तक्रारीवरून घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीने ट्रक नागपूर येथील जिया उर रहमान उर्फ जिया अन्सारी याच्या ताब्यात दिल्याचे समोर आले.

घुग्घुस पोलिसांनी नागपूर येथे छापा टाकून जिया अन्सारी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कबुली दिली की, साबीर अलीच्या सांगण्यावरून दोन्ही ट्रक गॅस कटरने कापून त्यांचे तुकडे करण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून चेसिसचे तुकडे, टायर, ऑईल टाकी, फायबर बोनेट व इतर साहित्य जप्त केले आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी साबीर अली सय्यद याच्यावर छत्तीसगडमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असून तो सध्या तेथील पोलिसांच्या ताब्यात आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, सचिन तायवडे, पोलीस शिपाई परमेश्वर डोईफोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.

पोलीस प्रशासनाचे नागरिकांसाठी आवाहन

वाहन विक्री किंवा भाड्याने देताना नागरिकांनी खालील बाबींची काळजी घ्यावी:
✔️ केवळ नोटरीवर विसंबून राहू नये; कर्ज अधिकृतरीत्या ट्रान्सफर करावे
✔️ खरेदीदाराची संपूर्ण पार्श्वभूमी तपासावी
✔️ व्यवहारापूर्वी CIBIL स्कोर तपासावा
✔️ RTO कडील अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय वाहन सुपूर्द करू नये.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular