Inter-state Burglary Gang Busted
चंद्रपूर :- शहरातील वडगाव परिसरात घडलेल्या घरफोडीच्या दोन गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलीस ठाण्याला मोठे यश मिळाले असून, मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी ३२९ ग्रॅम सोन्याचे दागिने, चारचाकी वाहन व मोबाईल असा एकूण ५७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Inter-state Burglary Gang Busted
दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी शुभम प्रदीप बारधमवार (रा. चिंतामणी रेसिडेन्सी, वडगाव) यांनी आपल्या घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दिली. त्याच दिवशी शेजारील सिध्दी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सौ. ज्योती दिनेश चंदनपाट यांच्या घरीही अशाच प्रकारे चोरी झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे क्रमांक २६५/२०२६ व २६६/२०२६ अन्वये बी.एन.एस. कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. Chandrapur Crime News

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व रामनगरचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके गठीत करण्यात आली. Chandrapur Police
पोलिसांनी १० ते १२ दिवस सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील मौजा टांडा येथे छापा टाकून १) राकेश मंगलसिंग मेहडा (वय २५, रा. बघोली, ता. कुकशी, जि. धार)
२) कंचन भगतसिंग मंडलोही (वय ४०, रा. बघोली, ता. कुकशी, जि. धार), ३) थानसिंग मेहतु भुरीया (वय २६, रा. बडीउपी, ता. जोबट, जि. अलीराजपूर) व ४) महेश कालू भुरीया (वय २५, रा. गुराडिया, ता. कुकशी, जि. धार) या चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचेकडून चोरी केलेले ३२९ ग्रॅम सोन्याचे दागिने, चारचाकी वाहन (GJ 14-AP 4098) आणि ६ मोबाईल असा एकूण ५७,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत आरोपींनी चंद्रपूर जिल्ह्यातील आणखी ४ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली असून, पुढील तपास सुरू आहे.
सदर उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा) व पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख (रामनगर) यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, सपोनि शिवाजी नागवे, पोउपनि कृष्णा दराडे, तसेच पोहवा सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार (स्थानिक गुन्हे शाखा) तसेच रामनगर पोलीस ठाण्यातील पोहवा आनंद खरात, पोअं संदीप कामडी, प्रकाश मडावी, प्रफुल पप्पुलवार, पंकज ठोबरे (रामनगर) व सायबर पोलीस ठाण्याचे कार्तिक खनके, विरू यादव, वैभव पत्तीवार, गुणवंत मुंडके यांनी केले.