Saturday, May 23, 2026
HomeMPमहिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये

महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये

Women should not lag behind in any field

चंद्रपूर :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या विशेष संकल्पनेतून चंद्रपूर शहरात महिलांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने १४ व १५ मार्च रोजी ‘टिकी टाका टर्फ’ येथे आयोजित या अटीतटीच्या सामन्यांमध्ये ‘आझाद गार्डन क्रिकेट संघाने’ आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर प्रथम पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत इरई क्रिकेट संघाने द्वितीय, तर महिला वकील संघाने तृतीय पारितोषिक मिळवत मैदानावर आपल्या खेळाची छाप पाडली. महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमात चंद्रपूरच्या अनेक महिला संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून क्रिकेटचा थरार अनुभवला.

यावेळी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष कुंदा जेणेकर, काँग्रेस प्रदेश महासचिव तथा नगरसेविका सुनंदा धोबे, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेविका संगीता भोयर, नगरसेविका वैशाली महाडोळे, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेवक रामनरेश यादव, प्रोफेशनल काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, दिलीप वावरे, गौतम नागदेवते, सेवादल युथ ब्रिगेट जिल्हाध्यक्ष सौरभ ठोंबरे, काँग्रेस नेते शामकांत थेरे, प्रवीण काकडे, राहुल तायडे, अतुल वाघमारे, नम्रता वावरे, अश्विनी खोब्रागडे, सुवर्णा लोखंडे, दीक्षा सातपुते, शालिनी भगत, छोटू सोमलवार, स्वप्नील कांबळे, राज यादव, संजय घागी, यश दत्तात्रय, मनीष दास, मोनू रामटेके, यांची उपस्थिती होती.

या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि चषकासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सांघिक यशासोबतच वैयक्तिक नैपुण्य गाजवणाऱ्या खेळाडूंनाही आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यामध्ये अनुष्का कल्लेपल्ली (आझाद गार्डन) ही ‘बेस्ट बॅट्समन’, अश्विनी जाधव (CMC) ही ‘बेस्ट बॉलर’ आणि श्वेता आईचवर (आझाद गार्डन) ही ‘बेस्ट फिल्डर’ ठरली. तसेच साधना प्रजापती (इरई संघ) हिला ‘वुमन ऑफ द सिरीज’चा बहुमान मिळाला. विजेत्यांना ड्रेसिंग टेबल, कुलर आणि डिनर सेट यांसारखी आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

यावेळी खेळाडूंना संबोधित करताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, “महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नये, आज स्त्रिया चूल आणि मूल या पलीकडे जाऊन उत्तम काम करत आहेत. आपल्या परिसरातील महिलाही कुठेच कमी नाहीत, मात्र त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. आगामी काळात महिलांसाठी मोठ्या क्रिकेट स्पर्धांसह इतर क्षेत्रांतही त्यांना पुढे येण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.” स्पर्धेच्या यशस्वीतेबद्दल आयोजक मराठा चॅरिटेबल ट्रस्ट व जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular