Wednesday, April 29, 2026
HomeCrimeमंदिर फोडून दानपेटीतील रक्कम लंपास

मंदिर फोडून दानपेटीतील रक्कम लंपास

Temple was broken into and money from the donation box was looted

चंद्रपूर :- भद्रावती शहरातील बाजार वॉर्ड परिसरातील दुर्गा माता मंदिरात चोरी करून दानपेटीतील रक्कम लंपास करणाऱ्या आरोपीस भद्रावती पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेली रक्कम व गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. Temple was broken into and money from the donation box was looted

या प्रकरणी पोलीस ठाणे भद्रावती येथे अप.क्र. ४२५/२०२६ कलम ३३१(४), ३०५(अ) बी.एन.एस. २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राजेश गोपीनाथ दास (वय ६२, रा. गजानन नगर, रेल्वे स्टेशन रोड, भद्रावती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मंदिर कुलूप लावून बंद करण्यात आले होते. मात्र दि. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी मंदिर उघडण्यास गेले असता मंदिराचे कुलूप व दानपेटीचा तळ तोडलेला आढळून आला. दानपेटीतील अंदाजे पाच ते सात हजार रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे निदर्शनास आले. Bhadrawati Police Station

तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी शुभम विठ्ठल झाडे (वय ३१, रा. झाडे प्लॉट, भद्रावती) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेली ४१०० रुपये रोख रक्कम तसेच दानपेटी फोडण्यासाठी वापरलेली एक लोखंडी सब्बल (किंमत अंदाजे २५० रुपये) असा एकूण सुमारे ४,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करत आहेत

सदर कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली, संतोष बाकल, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा तसेच योगेश्वर पारधी, पोलीस निरीक्षक, भद्रावती यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पीएसआय गजानन तुपकर, पोहवा जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, पो.अं. योगेश घाटोळे, संतोष राठोड व खुशाल कावडे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular