Monday, May 25, 2026
HomeIndustrial"नारी शक्ती आजिविका प्रदर्शनी" कार्यक्रम संपन्न

“नारी शक्ती आजिविका प्रदर्शनी” कार्यक्रम संपन्न

“Nari Shakti Ajivika Exhibition” organized jointly by Dhariwal Infrastructure Limited and Pahel Multipurpose Society

चंद्रपूर :- विकसित भारताची संकल्पना आज जर पूर्णत्वास येत असेल तर त्यात महिलांची भागीदारी हि नक्कीच नगण्य नाही. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले प्रतिनिधित्व सिद्ध केले असतांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी व आत्मनिर्भरतेकरिता एखादा उद्योग स्वयंस्फूर्तीने समोर येऊन काम करीत आहे हि बाब समाजासाठी तसेच उद्योगांना प्रेरणादायी आहे. धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हा उद्योग चंद्रपूर जिल्ह्याच्या होतकरू व गरजू महिलांना स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या करिता प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून स्वयंरोजगार निर्मिती करिता मदत करीत आहे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद च्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षिरसागर यांनी केले. Nari Shakti Ajivika Exhibition

धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व पहेल मल्टिपर्पज सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्राम पंचायत कार्यालय मोरवा येथे आयोजित “नारी शक्ती आजिविका प्रदर्शनी” कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या प्रदर्शनी मध्ये विविध महिला समूहांकडून निर्मित वस्तूंच्या विक्रीचे अनेक स्टॉल येथे लावण्यात आले होते. Dhariwal Infrastructure Limited and Pahel Multipurpose Society

धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे प्लांट हेड देवेश कुमार यांच्या संकल्पेनेतून व उपमहाव्यवस्थापक दिनेश गाखर यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यक्रमाच्या मंचावर उद्योगाच्या सामाजिक दायित्व निधी विभागाच्या महाप्रबंधक डॉ. निपा सहा शर्मा, संवर्ग विकास अधिकारी संगीता भांगरे, संचालक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था हरिश्चंद्र आत्राम, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चे मुख्य व्यवस्थापक डॉ. अनिष नायर, उपव्यवस्थापक रवि चावरे, CSR चे उपव्यवस्थापक प्रतिक वानखेडे, मोरवा ग्राम पंचायत च्या सरपंचा स्नेहा साव, उपसरपंच भूषण पिदूरकर, वरखडे मॅडम, राजकन्या ताकसांडे, अनिता मासिरकर ग्रा. पं. सदस्य मुकेश अतकरी, येरुर उपसरपंचा सुनिता वडस्कर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

महिलांनी स्वयंरोजगाराच्या संधींची वाटचाल करीत असतांना त्यांनी आपल्या आवडत्या स्वयंरोजगाराची निवड केली पाहिजे. जिल्हा परिषद उमेद चे सहकार्य यामध्ये घेतले पाहिजे. स्वयंरोजगार करतांना आपण स्वतः खरेदीचे ठिकाण प्रसंगानुरूप ठरविले पाहिजे ज्यातून आपल्या उत्पादनाला अधिकची मागणी मिळेल व ज्यातून आपला अधिक नफा करून घेता येईल अशा अनेक बाबींचा समर्पक विचार करून स्वयंरोजगाराची जोड आत्मसात करावी असे आवाहन सुद्धा यावेळी जिल्हा परिषद च्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षिरसागर यांनी केले.

महिलांचा या कार्यक्रमात असलेला उस्त्फुर्त प्रतिसाद त्यांनी स्वतः तयार केलेले उत्पादन व त्यांचे विविध स्टॉल बघून त्यांच्या उत्तुंग कौशल्याप्रती अभिमान व्यक्त करतांना महिलांनी “चूल आणि मूल” या संकल्पनेसोबतच स्वयंरोजगाराची कास धरली हि अत्यंत आनंदाची बाब आहे. महिलांनी कार्य करतांना जिद्द ठेऊन स्वतःला सिद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. आज उद्योग क्षेत्रातही महिलांचा सहभाग हा महत्वाचा असून असे उपक्रम आमच्या सारख्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना समाधान देणारा आहे असे मनोगत यावेळी धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड च्या सामाजिक दायित्व निधी विभागाच्या महाव्यवस्थापक डॉ. निपा सहा शर्मा यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.

यावेळी मोरवा सरपंच, उपसरपंच, संवर्ग विकास अधिकारी यांनीही उपस्थितांना यथायोग्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेकरिता पहेल मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने अंजु काकडे, अर्चना मोहितकर, अल्का पांघटीवार, सपना धांडे यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे संचालन अजय पारवे यांनी तर आभार प्रदर्शन पूजा पारवे यांनी केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular