Republic Day was celebrated with enthusiasm at the Rajura Municipal Council
चंद्रपूर :- भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नगर परिषद, राजुरा येथे सकाळी ठिक ८ वाजता नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. Republic Day was celebrated with enthusiasm at the Rajura Municipal Council
यावेळी त्यांनी आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी असलेले आपले व्हिजन नागरिकांसमोर मांडत, शहर विकासासाठी आवश्यक मौलिक सूचना देण्याचे आवाहन केले.
नगराध्यक्ष धोटे यांनी सांगितले की, शहरात राज्यस्तरीय सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, अतिक्रमण धारकांनाही घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच तलाव सौंदर्यीकरणाचे उर्वरित विकासकाम पूर्ण करणे, खारपाण्यावर प्रक्रिया करून स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करणे, आणि नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत दोन नवीन पाणी टाक्यांची उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, शहरातील ३०० महिला बचत गट व ५० पुरुष बचत गटांचे सक्षमीकरण, प्रशासक राजवटीदरम्यान निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण, तसेच शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी विविध महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, मुख्याधिकारी विवेक चौधरी, उपनगराध्यक्ष दिलीपभाऊ डेरकर, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, सार्वजनिक आरोग्य समिती सभापती अनंतकुमार ताजने, बांधकाम समिती सभापती अन्नु हरर्जितसिंग संधू, शिक्षण समिती सभापती पूनम गिरसावळे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता पथाडे, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक, स्थायी समिती सदस्य रमेश नळे, नगरसेवक सिद्धार्थ पाथडे, ईश्वर ठाकरे, इंदूबाई निकोडे, पोर्णिमा सोयाम, वज्रमाला बतकमवार, संध्या चांदेकर, निता बानकर, फरीना सय्यद, मंगला मोकडे, स्वप्नील मोहुर्ले, जुबेर शेख, किशोर हिंगाणे, एजाज अहेमद, भुवेश मेश्राम, अमोल चिल्लावार, प्रफुल कावडे, मयुरी पहानपटे यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक, अशोकराव देशपांडे, साईनाथ बतकमवार, सुरज ठाकरे, प्रभाकर येरणे, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रशासन अधिकारी बंडू ताजने यांनी केले.